लाइव न्यूज़
Add new comment
तरुण शेतकर्याची आत्महत्या

गेवराई (प्रतिनिधी) नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. तालुक्यातील खांडवी येथे शेतकर्याने शुक्रवारी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बाळासाहेब ढेंगळे (२७) असे शेतकर्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी त्यांनी शेतामधील लिंबाच्या झाला गळफास घेऊन जिवनयात्रा संपवली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नव्हते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.
