Add new comment

नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण यांच्याकडून बशीरगंज रस्ता कामाची पाहणी; जोड रस्त्यांचे भुमीपूजन

बीड (प्रतिनिधी) नगर पालिकेच्यावतीने शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून रस्त्यांचा विकास होवू लागला आहे. त्यांनी आज सकाळी बशीरगंज भागातील रस्ता कामाची पाहणी केली. यावेळी डॉ.भारतभूषण क्षीरसागर, सायं.दै.सिटीझनचे संपादक शेख मुजीब, युवासोबतीचे संपादक शेख ईसाक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जोड रस्त्यांचे नारळ फोडून भूमीपूजन करण्यात आले.
नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी आज सकाळी बशीरगंज भागातील रस्ता रूंदीकरण कामाची पाहणी केली. नागरीकांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानून बशीरगंजपासून जोड रस्त्याच्या कामांना सुरूवात केली. डॉ.भारतभूषण क्षीरसागर, सायं.दै.सिटीझनचे संपादक शेख मुजीब, युवासोबतीचे संपादक शेख ईसाक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नारळ फोडून जोड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नरसिंग नाईकवाडे, विश्‍वनाथ पोटे, इंजि.अखिल फारोकी, बाळु नाईक, शेख ईस्माईल, उमेश कोकाटे, सुरज कोकाटे, निलेश पवार, शैलेश नाईकवाडे, बबन नवले, अय्युब बागवान, शेख निसार, सचिन कोकाटे आदि उपस्थित होते.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.