Add new comment

वृध्द शेतकर्‍याचा निर्घृण खून मुंडके धडावेगळे केले; पोलिसांपुढे तपासाचे आव्हान

बीड/गेवराई (प्रतिनिधी) एका वृध्द शेतकर्‍याची निर्घृणपणे हत्या झाल्याचा प्रकार पहाटे उघडकीस आला. अज्ञात मारेकर्‍यांनी वृध्दाचे मुंडके धडावेगळे करत अत्यंत क्रुरपणे खुन केल्याची घटना बेलगाव (ता.गेवराई) येथे घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून सदरिल शेतकर्‍याची हत्या कोणी व का केली? याचे कारण दुपारी उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान बीड येथील जिल्हा रूग्णालयात वृध्दाचे शवविच्छेदन करण्यात आले असून अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने रूग्णालयात भेट देवून घटनेची माहिती घेतली.
गेवराई तालुक्यातील बेलगाव येथील लक्ष्मण काशिनाथ राऊत (६५) या वृध्द शेतकर्‍याचा मृतदेह आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्याच्याच शेतामध्ये आढळून आला. अज्ञात व्यक्तीने दोन दिवसांपूर्वी त्यांची हत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असून मुंडके धडावेगळे करत अत्यंत निर्घृणपणे हा खुन केल्याचे स्पष्ट होत आहे. राऊत यांची हत्या कोणी व का केली? याचे कारण मात्र दुपारी उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. मयत लक्ष्मण राऊत यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. सात वर्षापूर्वी मुलाचा विज धक्क्याने मृत्यू झाला होता. अशी माहिती समोर आली आहे. लक्ष्मण राऊत यांच्या खुनाच्या तपासाचे मोठे आव्हान गेवराई पोलिसांपुढे उभे राहिले आहे.
 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.