Add new comment

ना.रामदास कदम यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हा पदाधिकार्‍यांची बैठक

बीड (प्रतिनिधी) राज्याचे पर्यावरण मंत्री ना.रामदास कदम हे बीड जिल्हा दौर्‍यावर आले असुन त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे सुरू आहे. जिल्ह्यातील शिवसेना संघटन बांधणीकरीता ही बैठक महत्वाची ठरणार असुन स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा शिवसेनेने दिल्यानंतर जिल्ह्याची ही पहिलीच आढावा बैठक ना.कदम यांनी घेतली आहे. यावेळी माजी आ.सुनिल धांडे, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
बीड-गेवराई-आष्टी-पाटोदा मतदार संघाच्या पदाधिकार्‍यांसमवेत ही बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी जिल्ह्यातील शिवसेनेला बळकटी देण्यासाठी कार्यकर्त्यांना ना.रामदास कदम यांनी सुचना दिल्या असून पदाधिकार्‍यांसहीत कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आदेश त्यांनी दिल्याचे समजते.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.