Add new comment

विद्यार्थ्यांचा प्रमाणिकपणा ; सापडलेले पॉकेट केले परत

बीड ( प्रतिनिधी ) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्त्यावर सापडलेले पॉकेट त्यांनी थेट उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या स्वाधीन केले. खिरडकर यांनी त्या पॉकेटची खात्री पटवून संबंधित व्यक्तीकडे सुपूर्द केले.
बीड शहरातील अजय जाधव यांचे पॉकेट नवगण कॉलेज परिसरात हरवले होते. केसके महाविद्यालयातील शरद सांगळे व सिद्धांत जोगदंड या दोन विद्यार्थ्यांना ते पॉकेट रस्त्यावर सापडले. त्यांनी त्यात पाहिले असता काही पैसे व अन्य कार्ड त्यामध्ये आढळून आले. त्यांनी तात्काळ उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांचे कार्यालय गाठले व पॉकेट त्यांच्या स्वाधीन केले. खिरडकर यांनी तातडीने अजय जाधव यांची माहिती काढली.व त्यांना कार्यालयात बोलावून आधार कार्ड द्वारे ओळख पटवून ते पॉकेट जाधव यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामध्ये 12 हजार रुपये होते. विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल उप विभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांनी दोघांचे अभिनंदन केले.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.