Add new comment
निवृत्त पोलिस उपनिरीक्षक सय्यद मिसबाउल्लाह यांचे निधन

लाईफ स्टाईल जिमचे आर्शियानउल्लाह यांना पितृशोक
बीड ( प्रतिनिधी ) येथील सेवा निवृत्त पोलिस उपनिरीक्षक सय्यद मिसबाउल्लाह यांचे आज ( दि.3) सकाळी हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. लाईफ स्टाईल जिमचे सय्यद आर्शियानउल्लाह आणि पोलिस कर्मचारी सय्यद अहसानउल्लाह यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बीड शहरातील बुंदेलपुरा भागातील रहिवासी असलेले निवृत्त पोलिस उपनिरीक्षक सय्यद मिसबाउल्लाह यांचे आज सकाळी राहत्या घरी हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. पोलिस दलात कार्यरत असतांना त्यांनी विविध ठिकाणी कर्तव्य बजावले आहे. उल्लेखनीय कारकीर्द गाजवत त्यांनी आपल्या मुलांनाही चांगले शिक्षण दिले. मनमिळावू स्वभावाचे म्हणून ते परिचित होते. शहरातील नवी भाजी मंडई येथील लाईफ स्टाईल जिमचे मालक सय्यद आर्शियानउल्लाह आणि पोलिस कर्मचारी सय्यद अहसानउल्लाह यांचे ते वडील होत. आज शनिवारी ( दि.3 ) दुपारी 2 वाजता जोहरच्या नमाजनंतर तकीया मस्जिद परिसरातील कब्रस्तानमध्ये करण्यात येणार आहे. सय्यद कुटुंबियांच्या दुःखात सिटीझन परिवार सहभागी आहे.
