लाइव न्यूज़
Add new comment
इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने हाताची नस कापली आत्महत्येचा प्रयत्न; नातेवाईकांची कॉलेजविरूध्द तक्रार!

बीड (प्रतिनिधी) शहरातील यशवंतराव चव्हाण पॉलटेक्नीक कॉलेजमध्ये इंजिनिअरींगच्या वर्गात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याने आज सकाळी हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान महाविद्यालय प्रशासनाने शुल्क भरण्यासंबंधी तगादा लावल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून या प्रकरणात तक्रार देणार असल्याचे संबंधीतांनी सांगितले.
बीड शहरातील यशवंतराव चव्हाण पॉलटेक्नीक कॉलेजमध्ये इंजिनिअरींगच्या वर्गातील अजय सुर्वे या विद्यार्थ्याने हाताची नस कापून सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तात्काळ जिल्हा रूग्णालयातील वार्ड क्र.५ मध्ये दाखल करण्यात आले असून उशिरापर्यंत तो शुध्दीवर आला नव्हता. दरम्यान महाविद्यालय प्रशासनाने अजयकडे शुल्क भरण्यासंबंधी तगादा लावल्यानेच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
--------
