Add new comment

दिनेश मुंदडा यांच्या भगिनी तथा लेखिका अॅड.ज्योती कासट यांचे निधन

बीड (प्रतिनिधी) येथील माजी नगरसेवक दिनेश मुंदडा यांच्या भगिनी तथा सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्या, लेखिका ऍड.ज्योती गोविंद कासट यांचे र्‍हदयविकाराच्या धक्क्याने आज सकाळी निधन झाले. मृत्यू समयी त्या ४६ वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला असून सामाजिक चळवळीची मोठी हानी झाल्याच्या भावना व्यक्त होवू लागल्या आहेत.
बीड येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणार्‍या आणि जाणीव जागर या माध्यमातून महिलांच्या प्रश्‍नावर लिखाण करणार्‍या लेखिका ऍड.ज्योती गोविंद कासट यांचे आज सकाळी निधन झाले. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटु लागल्याने त्यांना डॉ.भोपळे यांच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली. ऍड.ज्योती कासट यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला असून घटनेची माहिती कळताच माजी आ.सय्यद सलीम, संदिप क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, बाळासाहेब पिंगळे, सलीम जहॉंगीर, अश्फाक इनामदार, नितीन धांडे, जैतुल्ला खान, झुंजार धांडे, दिलीप भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी रूग्णालयात गर्दी केली होती. येथील माजी नगरसेवक दिनेश मुंदडा, राजेश मुंदडा यांच्या भगिनी तर योगानंद जिनींगचे मालक गोविंद कासट यांच्या त्या पत्नी होत. आज रात्री ९ वाजता त्यांच्या पार्थिवावर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंदडा कुटूंबियांच्या दु:खात सिटीझन परिवार सहभागी आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.