Add new comment

माळापुरीत विवाहितेची आत्महत्या; सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

बीड (प्रतिनिधी) एका २३ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी माळापुरी (ता.बीड) येथे घडली. दरम्यान संतप्त नातेवाईकांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करा या मागणीसाठी आक्रमक पावित्रा घेतला होता. अखेर आज सकाळी मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड तालुक्यातील माळापुरी येथील निलोफर इम्रान बेग (वय २३) ही विवाहिता काल सायंकाळी घराबाहेर गेली होती. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका विहिरीमध्ये तिचा मृतदेह आढळला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात आणल्यानंतर मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आज सकाळी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलिसात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोघांना अटक करण्यात आली आहे

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.