Add new comment

पोलीस उपनिरीक्षक सय्यद सेवानिवृत्त

बीड-येथिल पोलीस दलात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक सय्यद वाजेद दि. 31 जानेवारी रोजी सेवा निवृत्त झाले. एका कार्यक्रमात त्यांचा सत्कार करून अनेकांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बीड जिल्हा पोलिस दलात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले सय्यद वाजेद हे दि. 31 जानेवारी रोजी निवृत्त झाले. सेवेत असतांना त्यांनी विविध गुन्ह्याच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे. पदाच्या माध्यमातून सय्यद वाजेद यांनी कर्तव्य तत्परतेने सेवा केली. त्यांच्या सेवा योगदानाबद्दल दि.31 जानेवारी रोजी भव्य सत्कार करण्यात आला. निवृत्तीबद्दल पोलीस दलासह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सय्यद वाजेद यांचा सत्कार केला करून पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.निवृत्त पोलिस उपनिरीक्षक सय्यद वाजेद हे शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी सय्यद शहेनशहा यांचे वडील आहेत.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.