Add new comment

​निर्भिड पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अपर्णा राठोड

बीड (प्रतिनिधी)ः- निर्भिड पत्रकार संघाच्या संवस्थापक अध्यक्षा रुचिता मलबारी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र अध्यक्ष अनिल घोरड, मराठवाडा अध्यक्ष शेख तालीब जिल्हा अध्यक्ष शेख तय्यब, शेख आमेर,शिवाजी पिंगळे, मुबशीर पठाण,यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवार दि. 27 जानेवारी 2018 रोजी विश्राम ग्रह बीड येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सर्वानुमते निर्भिड पत्रकार संघाच्य बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी अपर्णा राठोड यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 
विश्राम ग्रह बीड येथे दि.28 जानेवारी रोजी निर्भिड पत्रकार संघांची बैठक संपन्न झाली. या बैठकीस निर्भिड पत्रकार संघाच्या संवस्थापक अध्यक्षा वो संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये धारूर येथील मधुरगंध या वृत्तपत्राच्या संपादिका अपर्णा राठोड यांची निर्भिड पत्रकार संघाच्या बीड जिल्लाह उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली यावेळी अनिल घोरड,शेख तालीब,शेख तय्यब, आमेर शेख, शिवाजी पिंगडे, माया तिरमले,किरण डोळस,मुबशीर पठाण, इम्रान जागीरदार, आदींची उपस्थिती होती. यावेळी अपर्णा राठोड यांनी दिलेल्या जबाबदारी व्यवस्थित पार पाडेल असे आश्वासन दिले  

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.