Add new comment

बीड बाजार समीतीच्या ३५ गाळ्यांचे आ जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 बीड (प्रतिनिधी )येथील कृषी उत्पन बाजार समीतीने स्वनिधितून बांधलेल्या ३ कोटी ५८ लक्ष रुपयाच्या ३५ गाळ्यांचे उद्घाटन दि ३१ जानेवारी रोजी लोकनेते आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते होणार असल्याची माहीती सभापती दिनकर कदम यांनी दिली आहे. 

       शेतकरी ,व्यापारी आणि नागरीकांना अधिकाधिक सोयी उपल्ब्ध करुन देण्याच्या दृष्टीने बीड कृषी उत्पन बाजार समीतीने स्वनिधितून ३ कोटी ५८ लाख खर्चून ३५ गाळ्यांचे सूसज्ज बांधकाम केले आहे ,बाजार समीती कुर्ला  रोड येथे या गाळ्यामुळे व्यापा-यांची व नागरीकांची सुविधा सूलभ होणार आहे ,लोकनेते आ जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समीतीने शेतकऱ्यांच्या आणि व्यापा-यांच्या दृष्टीने सातत्याने हिताचेच निर्णय घेतले आहेत ,नवीन व्यावसायिकांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी गाळ्यांची निर्मिती गरजेची होती बाजार समीतीच्या याच परिसरालगत मोठा बायपास रस्ता झाल्याने वाहतूकीला अडचण येणार नाही हे लक्षात घेवून ३५ गाळे उभारण्यात आले ,दि ३१ जानेवारी २०१८ बूधवारी सकाळी ११ वाजता लोकनेते आ जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते व जेष्ठ व्यापारी सत्यनारायण लाहोटी ,नगराध्यक्ष डाँ भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थिति मधे गाळ्यांचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिति राहनार आहे या सोहळ्यास मोठ्या संख्येने शेतकरी बांधवानी ,व्यापार्यानी ,नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन बाजार समीतीते सभापती दिनकर कदम ,उपसभापती गणपत डोईफोडे ,अरुण डाके अच्यूत मोरे ,शिवाजी येडे ,शेख हबीबभाई ,भिमराव काळे ,अनिरुद्ध निर्मळ ,बळीराम गाडे ,सुमित्रा नवनाथ घोडके ,प्रमिला श्रीमंत सोनवने ,स्वाती विशाल बोबडे ,बबन गोरे ,राध्येशाम कासट ,हनुमान जगताप ,प्रभाकर नांदे व सखाराम मस्के आणि पदाधिकारी यांनी केले आहे

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.