Add new comment

एका भावाकडील वसुलीसाठी दुसऱ्या भावाचे अपहरण

 केज : एका भावाकडील वसुलीसाठी मुकादमाने दुसऱ्या भावाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज तालुक्यातील गौरवाडी येथे घडली. 
गौरवाडी येथील नवनाथ घाडगे हे मुलगा रविंद्र आणि सून राणूबाई यांच्या समवेत वाळवा सहकारी साखर कारखाना येथे उस तोडणीसाठी गेले होते. नवनाथचा दुसरा मुलगा जालिंदर याने जंबू धनपाल बंकापुर (ता. चिंकोटी, कर्नाटक) या मुकादमाकडून उचल घेऊनही तो कारखान्याला गेला नाही. मागील आठवड्यात रवींद्र हा देखील आजारी असल्याकारणाने कारखान्याहून माघारी आला. दरम्यान,  जालिंदर बाहेर गेला असताना जंबू धनपाल बंकापुरे हा राजु जगदाळे (रा. शिरुर, जि. कोल्हापुर) याच्यासोबत गौरवाडी वस्तीवर आला आणि त्याने तिझा भाऊ आमचे पैसे देत नाही म्हणून रवींद्र यास उचलून गाडीत घालून घेऊन गेले. दुसर्या दिवशी दोन्ही आरोपींनी फोन करून आमचे पैसे द्या आणि रवींद्रला घेऊन जा, पैसे दिले नाहीत तर त्यास जीवे मारुत असे धमकावले. याप्रकरणी रवींद्रची आई शोभा नवनाथ घाडगे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर केज पोलिसात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.