महाराष्ट्र

महाराष्ट्र इज्तेमा तयारी अंतिम टप्प्यात सर्व कायदेशीर बाबी पुर्ण; अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे इज्तेमा कमेटीचे आवाहन

बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्राचा राज्य इज्तेमा औरंगाबाद-लिंबेजळगाव येथे होत आहे. गेल्या सहा महिन्यापासून इज्तेमाची सुरू असलेली तयारी अंतीम टप्प्यात आहे. दि.२४, २५, २६ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या इज्तेमास राज्यभरातील मुस्लिम बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. इज्तेमाशी संबंधीत सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाले असून कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन औरंगाबाद इज्तेमा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

वीज कंपनीच्या कार्यालयातच ग्राहकाने घेतले विष

लाईनमन निर्मळ यांच्याकडे मिटरसाठी पैसे भरूनही कनेक्शन तोडल्याचा आरोप
 
 
बीड (प्रतिनिधी) विज मीटर कनेक्शनसाठी लाईनमन निर्मळ यांच्याकडे पैसे भरूनही त्यांनी दोन दिवसापूर्वी दिलेले मीटर काढून घेत कनेक्शन तोडल्याचा आरोप करत एका ग्राहकाने आज सकाळी विष प्राशन केले. बार्शी नाका येथील विज कंपनीच्या कार्यालयातच हा प्रकार घडला असून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या ग्राहकाला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बदल्यांसाठी राजकीय शिफारस आता पोलिसांना महागात

मंत्री,आमदारांची शिफारसपत्रे सादर करून हव्या त्या ठिकाणी नियुक्ती घेण्याची पद्धत पोलीस दलात नवी नाही.
——————————————————————
मुंबई -

मुडैश्वरात शिवभक्तांची मांदियाळी निसर्गसौर्याचाही भाविकानी लुटला आनंद भक्तीसोबतच पर्यटनाचा आनंद

केळगाव: महाशिवरात्रीनिर्मित मुडैश्वर संस्थान केळगाव येथे भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला यासोबतच परीसरातील निसर्गसोदर्याचा भाविकांनी लुटला आनंद निसर्गरम्य,अल्हादायक वातावरण नागमोडी वळणे,खोल-खोल दर्‍या पक्ष्यांचा किलबिलाट,प्रभु रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे श्री क्षेत्र मुडैश्वर होय हे ठिकाण सध्या भाविक पर्यटनाचा भुरळ घालीत आहे.

ज्येष्ठ नेते लक्ष्मण ढोबळेंनी धरले नितीन गडकरींचे पाय

सोलापूर:(व्रतसेवा): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असलेले लक्ष्मण ढोबळे यांनी चक्क केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे चरणस्पर्श केल्या

आत्महत्येशिवाय भरपाई मिळणार नाही का

अहमदनगर( प्रतिनिधी) माळशेज घाटात दरड कोसळून ठार झालेल्या ट्रकचालकाचे कुटुंब उघड्यावर आले आहे. सरकारकडे दोन वर्षे पाठपुरावा करूनही मदत मिळालेली नाही.

धर्मा पाटलांच्या कुटुंबीयांना ५४ लाखांचा मोबदला मिळणार

मुंबई (वृत्तसेवा) मंत्रालय विषप्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना ५४ लाख रुपयांचा मोबदला मिळणार आहे. धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमूल्यांकनाचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांनी ऊर्जा विभागाला सादर केला आहे. पाटील यांच्या पाच एकर जमिनीसाठी ५४ लाख रुपये मोबदला देण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. यापूर्वीचा पंचनामा रद्द करुन रोपांच्या संख्येनुसार सानुग्रह अनुदान ग्राह्य धरण्यात येणार आहे.

ना. पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने परळीत बचतगटांच्या वस्तूंचे जिल्हास्तरिय प्रदर्शन

खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते उद्या होणार उद्घाटन ; ३९ बचतगटांचा सहभाग

परळी,
- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने परळी येथे महाशिवरात्री निमित्त महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे जिल्हा स्तरिय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा स्तरावरचे अशा प्रकारचे प्रदर्शन पहिल्यांदाच होत असून याचे उद्घाटन खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते उद्या ( ता. १३ ) होणार आहे. जिल्हाभरातून सुमारे ३९ बचतगट यात सहभागी होणार आहेत.

बारावीच्या परीक्षा व्यवस्थापनात झाले मोठे फेरबदल 

बीड : यंदा बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून, ती २० मार्चपर्यंत चालणार आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अनेक बाबींमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने परीक्षा कक्षातील आसन मर्यादा, प्रश्नपत्रिकांच्या वाटपाचा समावेश आहे. 

मराठवाडा गुटखा तस्करांच्या विळख्यात; दरमहा १०० कोटींची होते तस्करी 

हैदराबादमार्गे नांदेड जिल्ह्यातील हुमनाबाद व लातूर जिल्ह्यातील उमरगा या चेकपोस्टमधून गुटखा घेऊन येणार्‍या ट्रक मराठवाड्यात येतात.
————————————————————————————
दिवसाकाठी १० ते १५ ट्रक या विभागात एफडीए आणि पोलीस प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन येतात. प्रत्येक वाहनात २५ लाखांच्या आसपास गुटखा असतो.
————————————————————————————

महाराष्ट्रात सध्या नांदेड प्रदेश काँग्रेस, उद्धव ठाकरे म्हण्जे रंग दिलेला वाघ -राणे

औरंगाबाद(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सध्या फक्त नांदेड प्रदेश काँग्रेस आहे, तिकडे उद्धव ठाकरे हे रंग दिलेला वाघ झालेत, तर ज्यांच्यावर आयुष्यभर खार खाल्ला त्याच स्व.

जालना जिल्ह्यात गारपिटीमुळे २ शेतकऱ्यांचा मृत्यू

जालना : अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मराठवाडा आणि विदर्भातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गारपिटीमुळे दोन शेतक-यांचा मृत्यू झालाय. 

भाषण, चर्चा नको पाकिस्तानशी युद्ध करा - प्रवीण तोगडिया

औरंगाबाद (प्रतिनिधी): देशात एकीकडे कर्जाने शेतकरी मरत आहेत. दुसरीकडे सीमेवर पाकिस्तान व दहशतवाद्यांच्या गोळीबारात सैनिक शहीद होत आहेत. कधीपर्यंत सैनिकांना शहीद होऊ द्यायचे. चर्चा खूप झाली, भाषणही नको आता थेट पाकिस्तानशी युद्ध करा. मिसाईल, टँकचा वापर करुन हल्ला करा , असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया यांनी येथे केले. 

खासगी सावकारी करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार - दिवाकर रावते

मुंबई -(व्रतसेवा) :एसटीतील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अगतिकतेचा गैरफायदा घेऊन अनधिकृतपणे खासगी सावकारी व्यवसाय करणाऱ्या एसटीतील काही तथाकथित अधिकारी/कर्मचाऱ्यावर यापुढे कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निर्देश परिवहन व खारभूमी विकास मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते

७४ कोटींचा टंचाई कृती आराखडा मंजूर

औरंगाबाद- प्रतिनिधी

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. आणखी तर तीव्र उन्हाळ्याचे दिवस पुढे असतानाच पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता बळावली आहे. जिल्ह्यातील सध्याची पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने त्यावर मात करण्यासाठी उपाय योजना करण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी ७४ कोटी २२ लाख ६६ हजारांचा टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंजूर केला आहे.

Pages