महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

दि. 18 मे 2020

 

**

 

          मुंबई, दि. 18- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या नऊ जणांनी आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यांना शपथ दिली.

          आज सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, विधान परिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम दिवाकर गोऱ्हे, शशिकांत जयवंतराव शिंदे, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, रमेश काशिराम कराड, प्रविण प्रभाकरराव दटके, गोपिचंद कुंडलिक पडळकर, अमोल रामकृष्ण मिटकरी, राजेश धोंडीराम राठोड यांचा समावेश होता.

तळीरामांचा प्रताप; गोदाम फोडून दारुचे बॉक्स पळवले

राज्यात लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने बंद असल्याने तळीरामांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यामुळे दारुच्या दुकानात चोरी झाल्याच्या बातम्या येत असतानाच नाशिकमधील तळीरामांनी तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचं गोदामच फोडून तीन लाख रुपये किंमतीची दारू पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

राष्ट्रवादीच्या गोटात सुंदोपसुंदी वातावरण? कर्जत जामखेड मतदारसंघात कार्यकर्ते पदाधिकारयांत ताळमेळ बसेना?

जामखेड - यासीन शेख 

विधानसभा निवडणूकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले आहेत. सत्ताधारी भाजपापुढे कडवे आव्हान उभे करण्यासाठी विरोधी राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करण्यास सुरवात केली असली तरी कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघात मात्र जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा ताळमेळ बसत नसल्याने आघाडीच्या विशेषता: राष्ट्रवादीच्या गोटात सुंदोफुंदीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघ गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला या भागाचे आमदार तथा राज्याचे वस्त्रोद्योग व पणन खात्याचे मंत्री प्रा राम शिंदे यांनी अधिक मजबूत करण्यासाठी गेल्या साडेचार वर्षाच्या मंत्रीपदाच्या माध्यमांतून जोरदार प्रयत्न केले. राम शिंदेंनी मजबूत केलेल्या बालेकिल्ला काबीज करण्याचे स्वप्न बघणारी राष्ट्रवादी भाजपाविरोधी वातावरण निर्मिती करण्यात सध्यातरी बॅकफुटवरच असल्याचे दिसत आहे. बूथबांधणी पासुन ते कार्यकर्ते व नेते यांच्या मनोमिलनात राष्ट्रवादीला मोठे यश येताना दिसत नाही. राष्ट्रवादीला खरोखरी भाजपाचा बालेकिल्ला उध्दवस्त करायचा असेल तर निष्ठावंतांसह जुन्या नव्यांचा योग्य ताळमेळ ठेवण्याबरोबरच तरूणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल

भाजपाची जमेची बाजू 

भाजपाकडे तगडे कार्यकर्त्यांचे असलेले जाळे भाजपासाठी जमेची बाजू असून राम शिंदे यांच्या विजयात हेच प्रामाणिक कार्यकर्ते ताकदीने यापुर्वी काम करताना दिसत होते. यंदाही भाजपातील प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी राम शिंदे यांच्या विजयासाठी कामाला लागली आहे.भाजपात वाद विवाद असले तरी नाराजांची निष्ठा राम शिंदे  असल्याने नाराज कार्यकर्ते राम शिंदेंसाठी पक्षातील बेबनाव जाहिर न करता राम शिंदे यांच्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करताना मतदारसंघात दिसू लागले आहेत

एसटी झाली ७१ वर्षांची; एसटी महामंडळाचा १ जून रोजी वर्धापनदिन

  मुंबई: राज्यातील खेड्यापाड्यांतून, गावागावांतून विहार करणारी लालपरी आता ७१ वर्षांची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापनदिन येत्या शनिवारी १ जून २०१९ रोजी राज्यात सर्व विभागीय आणि जिल्हापातळीवरील एसटीच्या सर्व ५६८  बसस्थानकांवर  साजरा केला जाणार असल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

पुण्यातील बेपत्ता तरुणाच्या खून प्रकरणाचा उलगडा ; सौताडा घाटात सापडले अवशेष

जामखेड :  पुणे परिसरातून मागिल सतरा दिवसांपासुन बेपत्ता असलेल्या तेजस भिसे या तरूणाची  आर्थिक देवाणघेवाणीतून मित्रानेच हत्या केल्याची बाब उडकीस आणण्यात वाकड पोलिसांना यश आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी जामखेड तालुक्यातील रहिवासी असुन त्याने तेजसची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह जामखेड जवळील सौताडा घाटातील दगडाखाली टाकून दिला होता ही बाब पोलिसा तपासात उघडकीस आली आहे. मृतदेहाचे अवशेष सौताडा घाटात सापडल्यानंतर दोघा आरोपींविरोधात पुणे येथील वाकड पोलीस स्टेशनला खुनाचे गुन्हे  दाखल केले जाणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. 

साकत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सदाशिव वराट

जामखेड, (प्रतिनिधी):- तालुक्यातील सर्वांत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या साकत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सदाशिव वराट यांची बिनविरोध निवड झाली आहे.     साकतचे सरपंच पद  इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. पहिले सव्वा वर्ष छाया प्रभाकर वराट या सरपंच होत्या त्यानंतर चंद्रकांत लक्ष्मण वराट हे सव्वा वर्ष सरपंच होते. त्यांनी १ जुन रोजी राजीनामा दिला होता. यामुळे सरपंच पद रिक्त होते. आज सदाशिव वराट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी डॉ.

संघाच्या सोशल मीडियाप्रमुखासह चौघेजण राज्यसभेवर

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था):- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक आणि सोशल मीडियाप्रमुख राकेश सिन्हा यांच्यासह कामगार नेते राम शकल, मूर्तीकार रघुनाथ महापात्रा आणि प्रसिद्ध नृत्यांगणा सोनल मानसिंह यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या चारही जणांना राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. 

थर्माकोलवर बंदीच; हायकोर्टाचं शिक्कामोर्तब

मुंबई, (प्रतिनिधी):- पर्यावरणाला हानिकारक गोष्टींना परवानगी देणे शक्य नाही, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं थर्माकोलच्या वस्तू, मखर आणि सजावटीच्या साहित्यावरील बंदी कायम ठेवली आहे. यासंदर्भात सविस्तर आदेश याआधीच दिले असून, विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला आहे, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तसंच थर्माकोल फॅब्रिकेटर अँड डेकोरेटर असोसिएशनची विनंतीही फेटाळून लावली. 

चिदंबरम यांच्या घरातून हिरे चोरीला

चेन्नई, (वृत्तसंस्था):- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या तामिळनाडू येथील घरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरातून हिरे, सोनं आणि १ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबत नुंगमबक्कम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. 

जामखेडच्या वस्तीगृहात सडके अन्न

जामखेड, (प्रतिनिधी):- येथील मागासवर्गीय वस्तीगृहातील मुलींना सडके अन्न व अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी वस्तीगृहाला भेट देवून मुलींच्या तक्रारी ऐकून घेतल्या. या प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात येणार असल्याचे नाईकवाडे यांनी सांगितले.

महिला कॉन्स्टेबलच्या मुलीचा पोलिस उपायुक्तांवर बलात्काराचा आरोप

औरंगाबाद, (प्रतिनिधी):- एमपीएसी परीक्षेच्या मार्गदर्शनाच्या बहाण्याने पोलिस उपायुक्तांनी बलात्कार केला, असा खळबळजनक आरोप महिला पोलिसाच्या मुलीने केला आहे. औरंगाबाद पोलिस उपायुक्तांवर हा आरोप करण्यात आल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

लातुरातील अविनाश चव्हाण हत्या प्रकरणाचं गूढ उकललं!

लातूर : ‘स्टेप बाय स्टेप’ क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येचं गूढ उकललं आहे. अविनाश चव्हाण यांची हत्या व्यावसायिक वादातूनच झाल्याचं उघड झालं आहे.

कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार कोसळणार?

बेंगळुरू, (प्रतिनिधी):-कर्नाटकातील राजकीय संकट अद्याप दूर झालं नाही. सुरुवातीला संख्याबळ, त्यानंतर मंत्रिमंडळ खातेवाटप आणि आता बजेटवरून नवीन वाद निर्माण झाला असून, ५ जुलैला बजेट सादर करण्यापूर्वीच राज्यातील अवघ्या चार आठवड्यांचं एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार कोसळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

नारायण राणेंनी घेतली छगन भुजबळांची भेट

मुंबई, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि खासदार नारायण राणे यांनी गुरुवारी छगन भुजबळ यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असून वांद्रे येथील ‘एमईटी’मध्ये ही भेट झाल्याचे वृत्त आहे. या भेटीमध्ये काय चर्चा झाली, याबाबतचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.

स्वबळावरच लढणार; अमित शाहांच्या ‘मातोश्री’ वारीनंतरही शिवसेना ठाम

मुंबई, (प्रतिनिधी):- शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असली तरी शिवसेनेचा आक्रमक पवित्रा कायम आहे. शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय आधीच घेतला असून तसा ठराव देखील पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. आता या निर्णयात बदल होणार नाही, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

जामखेडमध्ये न.प.कडून स्वच्छता अभियान

जामखेड, (प्रतिनिधी):-स्वच्छ भारत स्वच्छ महाराष्ट्र अभियानातर्ंगत जामखेड शहर स्वच्छ सूंदर ठेवण्यासाठी शहरातील कचरयाचे ओला सूका असे वर्गीकरण कसे करावे व त्याची विल्हेवाट कशी लावायची याबाबत मुख्याधिकारी विनायक औधकर यांनी सफाई कामगारांना मार्गदर्शनपर माहिती दिली 

काठी नी घोंगड घेऊन धनगर आरक्षणास लढ्यात उतरणार : खा सुप्रिया सुळे

जामखेड,(प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जन्मगाव चौंडी ता जामखेड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी खा.सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात आ.भरणे मामा,जि प अध्यक्ष विश्वास देवकते,निलेश राऊत,सक्षणा सलगर,वडकुटते, राम, आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते याप्रसंगी या कार्यक्रमाचे आयोजक यशवंत सेंना धनगर समाज नेते भारत सोन्नर व पदाधिकार्‍यांच्या वतीने खा.सुप्रिया ताई

जामखेडला ट्रक व लग्झरी अपघातात दोन ठार

जामखेड, (प्रतिनिधी):-जामखेडपासून चार कि.मी अंतरावर खर्डा रोडवरील शिऊर फाटा येथे मालट्रक आणि हैदराबाद येथील साई भक्तांना घेऊन जाणार्‍या लग्झरी बसचा दि १जुन रोजी पहाटे ४ वाजता भिषण अपघात झाला असून अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यु, अनेक जखमी झाले आहेत जखमींना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जामखेडसह परिसरात रात्री दोन वाजेपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने विज गेल्याने सर्वत्र अंधार काळोख पसरला होता.

Pages