मुडैश्वरात शिवभक्तांची मांदियाळी निसर्गसौर्याचाही भाविकानी लुटला आनंद भक्तीसोबतच पर्यटनाचा आनंद

केळगाव: महाशिवरात्रीनिर्मित मुडैश्वर संस्थान केळगाव येथे भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला यासोबतच परीसरातील निसर्गसोदर्याचा भाविकांनी लुटला आनंद निसर्गरम्य,अल्हादायक वातावरण नागमोडी वळणे,खोल-खोल दर्‍या पक्ष्यांचा किलबिलाट,प्रभु रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे श्री क्षेत्र मुडैश्वर होय हे ठिकाण सध्या भाविक पर्यटनाचा भुरळ घालीत आहे. मराठवाडा आणि खादेन्शच्या सर हद्दीवर आणि केळगाव (ता सिल्लोड) पासून उत्तरेस 36 किलोमीटर अंतरावर अजिंठ्याच्या डोंगररागाच्या कुशीत भक्तीसोबत पर्यटनाचा येथे आनंद आहे मुडैश्वर मंदिर अतिप्राचीन मंदिर आहे मंदिराच्या पूर्वेकडील तटबंदी भिंत बुरुजावर गेरवट भगव्या रंगाची जाळीदार रेखीव नक्षी,हत्तीचे शिल्प आहे सुर्यासमयी शिंवलीगावर सुर्यकिरणे पडतात प्रभु रामचंद्र वनवसाला निघाले असता ते या ठिकाणी थांबले आणि त्यांनी तेथे शिंवलीग स्थापन केली.येथून प्रभु रामचंद्रनिघाले असता त्यांनी मागे वळून (मुरडून) पाहिले म्हणुन मुडैश्वर असे नाव पडले मंदिरामागील परीसरात प्रकारच्या वर्नेषधी आहेत फळा -फुलांचा सुंगध हा पर्यटकाना आकर्षित करीत असतो येथे भक्तीसोबतच पर्यटनाचा आनंद मिळतो.

धार्मिक कार्यक्रम: येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडतात तसेच विविध शैक्षणिक संस्थाच्या वतीने शैक्षणिक सहलीचेही आयोजन करण्यात येते येथे अन्नदान सेवा असून येथुनच जवळ पूर्वेस सहा ते सात किलोमीटर अंतरावर सहाव्या शतकातील घटोत्कच लेणी आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.