अंबाजोगाई

आदल्या दिवशी झालेल्या भांडणाच्या रागातून कोपलेंवर हल्ला; सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

अंबाजोगाई : सोमवारी सकाळी अंबाजोगाई नगर पालिकेचे स्वीकृत सदस्य कमलाकर कोपले यांच्या प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रात्री उशिरा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अंबाजोगाईत भाजप नगरसेवक कोपलेंवर सशस्त्र हल्ला

अंबाजोगाई, (प्रतिनिधी):- येथील भाजपचे नगरसेवक कमलाकर कोपले यांच्यावर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला केल्याची घटना आज दुपारी घडली. हल्ल्यामध्ये कोपले हे गंभीररित्या जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने अंबाजोगाईसह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच आ.संगीता ठोंबरे अंबाजोगाईकडे रवाना झाल्या आहेत.

पुलात मोटारसायकल कोसळून विद्यार्थी ठार

अंबाजोगाई, (प्रतिनिधी):- लातूर - अंबाजोगाई रोडवरील वाघाळा पाटीजवळ सध्या काम सुरु असलेल्या पुलात मोटारसायकल कोसळून एक महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री उशिराच्या सुमारास झाला.

अंबाजोगाईतील सावरकर मल्टीस्टेटच्या कार्यालयात चौघांचा धुडगूस एफडीचे पैसे परत द्या म्हणून कर्मचार्‍यांना शिवीगाळ करुन बाहेर काढले

बीड, (प्रतिनिधी):- अंबाजोगाई येथील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑप सोसायटीच्या शिवाजी चौक शाखेमध्ये काल सायंकाळी चौघांनी धुडघूस घातला. एफडीचे पैसे परत द्या असे म्हणत कर्मचार्‍यांना शिवीगाळ करुन खुर्ची फेकून दिली. रोखपालास जिवे मारण्याची धमकी देत १ लाख २ हजार ५४० रुपयांचा बेअरर चेक देण्यास भाग पाडले व सर्व कर्मचार्‍यांना बाहेर काढून हाकलून देत शाखेला कुलूप लावले या प्रकरणी चौघांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरपगाव येथे दोन गटात हाणामारी; दहा गंभीर जखमी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरपगाव गावात विहिरीच्या मस्टरवर सही करण्यावरून सरपंच आणि विरोधी गटात झालेल्या हाणमारीत १० जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी घडली.

औरंगाबाद येथील इजतेमसाठी उर्दू  शाळांना एक दिवसाची विशेष सुट्टी जाहीर परीक्षांमध्ये बाधा येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना 

बीड ( प्रतिनिधी ) औरंगाबाद जिल्ह्यातील लिंबेजळगाव येथे होत असलेल्या राज्य इजतेमसाठी शासनाने दि. 26 फेब्रुवारी रोजी विषेश सुट्टी जाहीर केली आहे. शिक्षक आणि मोठ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवशी होणाऱ्या दुवामध्ये सहभागी होता यावे यासाठी मूफ़टा उर्दू शिक्षक संघटनेने यासंदर्भात शासनाकडे मागणी केली होती. त्यास यश आले आहे.

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी कृती समितीचे जनआंदोलन अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरवात सेलूअंबा ग्रामस्थांनी केले धरणे आंदोलन;आंदोलनाचा पहिला दिवस

अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाईकरांच्या अस्मितेचा बनलेल्या अंबाजोगाई जिल्हा निर्मीतीच्या मागणीसाठी अंबाजोगाईकरांच्या वतीने जनआंदोलनाचा उठाव करण्यात आला असून दिनांक 21फेब्रुवारी पासून राज्य सरकारचे या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी जिल्हा कृती समितीने बेमुदत धरणे आंदोलन उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर सूरु केले आहे. आजच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सेलूअंबा येथील ग्रामस्थांनी जिल्हा निर्मितीसाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होऊन धरणे आंदोलन केले.

शिष्यवृत्तीच्या परिक्षेत उत्तरपत्रिकेच्या वाटपात झाला घोटाळा विद्यार्थ्यांना पर्यवेक्षकांनी दबाव टाकुन गप्प बसवले

अंबाजोगाई (प्रतिनिधी) तालुक्यातील पाचवी व आठवी च्या वर्गात शिकणार्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परिक्षा महाराष्ट्र शिक्षण परिषदेने दि. १८ फेब्रुवारी पासुन घ्यायला सुरूवात केली मात्र पहिल्याच दिवशी शिष्यवृत्तीच्या परिक्षेतील उपरपत्रिका वाटपात घोटाळा झाल्याचे  उघडकीस आले  आहे.

Pages