महाराष्ट्र

माजलगावमध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल फेरी

माजलगाव, (प्रतिनिधी):- पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके यांच्या नेतृत्वात आज सायकल फेरी काढण्यात आली. स्वत: जयसिंह सोळंके यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते सायकलवर बसुन तहसिल कार्यालयापर्यंत गेले होते.

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला

मुंबई, (प्रतिनिधी):- जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची ’सिल्व्हर ओक’ या पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली.
जामिनावर जेलबाहेर आल्यानंतर छगन भुजबळ आणि शरद पवार यांची ही पहिलीच भेट होती. जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन शरद पवारांचा आला, असंही भुजबळांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं होतं.
भुजबळ आज सकाळी आपल्या सांताक्रूझमधील निवासस्थानावरुन पवारांच्या भेटीसाठी गेले.

जामखेड दुहेरी हत्याकांड : मुख्य सूत्रधाराला अटक उल्हास माने यास १० मे पर्यंत पोलिस कोठडी

अहमदनगर, (प्रतिनिधी):-जामखेड दूहेरी हत्याकांडाचा कट रचलेल्या त्या तालिमचे मालक वादग्रस्त उल्हास माने उर्ङ्ग टकलू तुपवाला यास जामखेड पोलीसांनी  गजाआड केले. जामखेड दुहेरी हत्याकांड मधील आरोपी उल्हास माने याला  पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार , पोलीस कर्मचारी  अल्ताङ्ग शेख, बढे , अमीन शेख यांच्या टिमने कर्जत तालुक्यातील एका शिवारात आज सकाळी ९.४५ वा पोलिस मित्राचे मदतीने ताब्यात घेतले आहे.

दुहेरी हत्याकांड प्रकरणातील टकलू तूपवाला पोलिसांच्या जाळ्यात

जामखेड, (प्रतिनिधी):-जामखेड दूहेरी हत्याकांडाचा कट रचलेल्या त्या तालिमचे मालक वादग्रस्त उल्हास माने उर्ङ्ग टकलू तुपवाला यास जामखेड पोलीसांनी  गजाआड केले.

मोफत स्मार्टफोन, लॅपटॉप आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी; कर्नाटकमध्ये भाजपाचा जाहिरनामा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने शुक्रवारी जाहिरनामा प्रकाशित केला. शेतकऱ्यांना एक लाखांपर्यंतचे कर्जमाफ, द्रारिद्रय रेषेखालील कुटुंबातील महिलांना मोफत स्मार्टफोन, महाविदयालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत लॅपटॉप असे आश्वासन जाहिरनाम्यात देण्यात आले आहे.

जामखेड दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीस १० मे पर्यंत पोलिस कोठडी

जामखेड, (प्रतिनिधी):- राळेभात बंधूंच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी गोविंद दत्ता गायकवाड यास न्यायालयाने १० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ऍट्रॉसिटीच्या निर्णयाला स्थगिती नाही: सुप्रीम कोर्ट

ऍट्रॉसिटी कायद्यान्वये तक्रार दाखल झाल्यास थेट अटक न करता, प्राथमिक चौकशीनंतरच संबंधितांकडून अटकेबाबत निर्णय घेण्यात यावा, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने २० मार्चला दिला होता.

गेवराईच्या मद्यधुंद पीएसआयचा हॉटेलमध्ये राडा

हॉटेलमध्येच फ्रीस्टाईल; मालकासह ग्राहकांवर रोखले पिस्तूल; स्थानिक पोलिस अधिकार्‍याच्या श्रीमुखातही लगावल्या
अहमदनगर, (प्रतिनिधी):- पाथर्डी शहरातील शेवगाव रोड लगत असलेल्या मधुबन हॉटेल येथे तारखेश्वर गडावरील बंदोबस्तावरून घरी परतत असताना गेवराई (जि.बीड) पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमोल तानाजी मालुसरे यांनी मद्यधुंद अवस्थेत हॉटेल चालक, ग्राहक व पोलीस यांना रीव्हाल्हरचा धाक दाखवत राडा केला. याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी मालुसरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

...तर आम्ही शस्त्र हाती घेऊ -उद्धव ठाकरे

अहमदनगर, (प्रतिनिधी):-गृहराज्यमंत्र्यांनी आपले अधिकार वापरले तर त्यांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे मुख्यमंत्री असतील तर सरकारचं कठीण आहे, असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलाय. उद्धव ठाकरे आज अहमदनगरच्या दौर्‍यावर असून त्यांनी हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबियांची भेट घेतली. शिवसेनेकडून कुटुंबियांना प्रत्येकी १५ लाख ५० हजाराची आर्थिक मदतही देण्यात आली आहे.

आसारामला जन्मठेप; अन्य दोघांना प्रत्येकी २० वर्षाची शिक्षा

दिल्ली, (वृत्तसंस्था):-स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू याच्याविरोधातील बलात्कार प्रकरणात बुधवारी जोधपूरमधील न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाने आसाराम बापूसह सर्व आरोपींना दोषी ठरवले असून दुपारी उशिरा न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची तर शरद आणि शिल्पी यांना प्रत्येकी २० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आसारामवर होता, ज्याची सुनावणी जोधपूरमधल्या विशेष एससी-एसटी न्यायालयात झाली.

कॉंग्रेसला धक्का, उपराष्ट्रपतींनी फेटाळला सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोग प्रस्ताव

दिल्ली, (वृत्तसंस्था):- स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच दाखल झालेला सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी फेटाळला. या प्रस्तावाला कॉंग्रेससह सात विरोधी पक्षांचा पाठिंबा होता.सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर गैरवर्तणूक व अधिकारांचा गैरवापर असे दोन प्रमुख आरोप ठेवून कॉंग्रेस व इतर सहा विरोधी पक्षांनी शुक्रवारी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन महाभियोगाची नोटीस दिली होती.

अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था):- १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार केल्यास आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला आज राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने पोक्सो कायद्यात सुधारणा करून काल यासंदर्भात वटहुकूम काढला होता. कठुआ, सुरत आणि इंदूर या ठिकाणी लहान मुलींवर बलात्कार करण्यात आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. 

भामरागडमध्ये पोलिसांबरोबरील चकमकीत १४ नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली, (प्रतिनिधी):- गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात पोलिसांनी सुमारे १४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले असून यामध्ये जहाल नक्षलवादी साईनाथ, सिनूचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे. भामरागड तालुका हा नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या चकमकीत १४ नक्षलवादी ठार झाले आहेत.

भाजपचे केंद्रीय मंत्री बरळले, इतक्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक-दोन घटना होणारच

दिल्ली, (वृत्तसंस्था):-देशात अल्पवयीन मुलींवर होणार्‍या बलात्काराविरोधात मोदी सरकार कठोर कायदे आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे मोदी यांच्या कॅबिनेटमधील केंद्रीय मंत्री संतोषकुमार गंगवार हे याप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. उन्नाव आणि कठुआ बलात्कारप्रकरणी बोलताना गंगवार यांनी भारतासारख्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक-दोन घटना होत असतात, ही काही मोठी गोष्ट नसल्याचे म्हटले. त्यांच्या वक्तव्याचा राजकीय क्षेत्रातून विरोध होताना दिसतोय.

एसटीचा तोटा भरण्यासाठी तिकीट दरवाढ हाच एकमेव पर्याय?

धुळे, (प्रतिनिधी):- सातत्याने वाढणार्‍या डिझेल किमतीचा थेट परिणाम राज्यातील एसटी महामंडळाच्या खर्चावर झाला आहे. दररोज दोन कोटी रुपयांनी तोट्यात असणार्‍या एसटीला डिझेल दरवाढीमुळे आणखी ९७ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी येत्या काही दिवसात प्रवाशांना अपरिहार्यपणे एसटीच्या तिकीट दरवाढीला सामोरं जावं लागणार आहे.

ना.राम शिंदेंच्याहस्ते हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन

जामखेड, (प्रतिनिधी):-जामखेड येथे केंद्र  सरकारच्या आधारभूत खरेदी केंद्रांतर्गत हरबरा खरेदी केंद्राचे उद्घाटन जलसंधारण तथा पालकमंत्री ना राम शिंदे यांच्या हस्ते झाले 
शेतकर्‍यांच्या हितासाठी नवीन तहसील कार्यालयासमोर जून्या शासकीय गोडाऊन येथे हरबरा शासनाच्या हमी भावाने खरेदी करण्याचे लगेच  काम सुरू झाले आहे 

न्या. लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच, चौकशीची आवश्यकता नाही: सुप्रीम कोर्ट

मुंबई, (प्रतिनिधी):-गुजरातमधील सोहराबुद्दीन खून खटल्याच्या सुनावणीसाठी नियुक्त करण्यात आलेले सीबीआय न्यायालयाचे न्यायधीश ब्रीजगोपाल लोया यांचा डिसेंबर २०१४ मध्ये मृत्यू झाला होता.

Pages