जामखेड दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीस १० मे पर्यंत पोलिस कोठडी

जामखेड, (प्रतिनिधी):- राळेभात बंधूंच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी गोविंद दत्ता गायकवाड यास न्यायालयाने १० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
जामखेड शहरात राष्ट्रवादीचे पदाधिकारी योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोघांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना घडली होती. सदर घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दोन दिवस जामखेड बंद ठेवून पोलिस प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला होता. आरोपींंच्या शोधासाठी १० पथके रवाना करण्यात आली होती. अखेर या प्रकरणातील मुख्य आरोपी गोविंद गायकवाड यास पुणे जिल्ह्यातील मांडवगण फाटा येथून अटक करण्यात आली होती. त्यास आज दुपारी दिड वाजता जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश मुजावर यांच्यासमोर हजर केले असता, न्यायालयाने गोविंद दत्ता गायकवाड यास १० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.