बीड शहर

बीड जिल्ह्यात आज 342 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 342  पॉझिटिव्ह 

बीड जिल्ह्यात काल , आज 404 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात काल , आज  404 पॉझिटिव्ह 

संपादक गंमत भंडारी यांना मातृशोक

संपादक गंमत भंडारी 
यांना मातृशोक 

बीड दि.15 ( प्रतिनिधी ) दै. पार्श्वभूमीचे संपादक गंमत भंडारी यांच्या आई राधाबाई नंदलाल भंडारी यांचे आज मंगळवारी दुपारी सव्वा एक वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 87 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.  राधाबाई भंडारी यांच्या पश्चात तीन मुले, सहा मुली असा परिवार आहे.भंडारी कुटुंबियांच्या दुःखात सिटीझन परिवार सहभागी आहे. 
 

बिंदुसरा : मोठ्या चादरीवरून पाणी वाहू लागले

बिंदुसरा : मोठ्या चादरीवरून पाणी वाहू लागले 

बीड दि. 15 ( प्रतिनिधी ) शहरापासून जवळच असलेल्या पाली येथील बिंदुसरा प्रकल्प 100 टक्के भरला असून आज पहाटेपासून मोठ्या चादरीवरून पाणी वाहू लागले आहे. 
बीड जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री पासून ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. बीड शहर आणि परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरापासून जवळच असलेला बिंदुसरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून आज पहाटे पासून मोठ्या चादरीवरून पाणी वाहू लागले आहे. 
 

अल्पवयीन प्रेमयुगलांची आत्महात्या

तीन दिवसापासुन दोघेही गायब होते

 

 

बीड प्रतिनिधी

 

अल्पवयीन प्रेमयुगलांची आत्महात्या

तीन दिवसापासुन दोघेही गायब होते

 

 

बीड प्रतिनिधी

 

बीड जिल्ह्यात आज 108 पॉझिटिव्ह

*बीड : आज 108 पॉझिटिव्ह तर 605 निगेटिव्ह*
*http://www.live.beedcitizen.com/newsid/6215*
----------------
*बीड 40, अंबाजोगाई 5, परळी 9, माजलगाव 9, आष्टी 16, केज 16, गेवराई 2, शिरूर 4, धारूर 3, वडवणी तालुक्यात 4 रुग्ण आढळले*

बीड जिल्ह्यात आज 233 पॉझिटिव्ह

 

बीड दि.10( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे जिल्हा प्रशासनाला आज सोमवारी सकाळी प्राप्त झालेल्या 3855 अहवाला पैकी 233 पॉझिटिव्ह तर 3622 निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत बीड शहरातील अँटिजेंन टेस्टमधील पॉझिटिव्ह सह तालुक्यात 163 रुग्ण आढळले आहेत. अंबाजोगाई 10, आष्टी 6, धारूर 2, गेवराई 10, केज 7 माजलगाव 7 , परळी 22 , पाटोदा 2 , शिरूर 3 आणि वडवणी तालुक्यात 1 असे 233 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

बीड शहरासह परळी, अंबाजोगाई ,आष्टी व केजमध्ये 10 दिवसांचा लॉकडाऊन

बीड दि.9 ( सिटीझन ) बीड जिल्ह्यामध्ये विषाणूंचा प्रादुर्भाव वाढ झाली आहे त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने दिनांक 11 ऑगस्ट रोजी रात्री बारापासून बीड,  शहरासह परळी,  अंबाजोगाई ,आष्टी आणि  केज शहरांमध्ये दहा दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी काढले आहेत. बीड शहरासह अंबाजोगाई परळी केज आष्टी या शहरांमध्ये दिनांक 11 ऑगस्ट रोजी रात्री बारापासून म्हणजेच दिनांक अकरा व बारा ऑगस्ट मधील रात्री 12 पासून दिनांक 21 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात येणार असे आदेशात म्हटले आहे.

नागरिकांनी 'बकरी ईद' घरातच राहून साजरी करावी-- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 

बीड (सिटीझन) :-मुस्लिम धर्मीयांचा महत्त्वाचा बकरी ईद हा सण सर्व मुस्लिम धर्मीय नागरिकांनी घरीच नमाज अदा करून साजरा करावा, कोरोना संसर्गाचा धोका वाढला असल्याने या कालावधीत मस्जिद मध्ये जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज केले

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात याबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे , निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे , बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे आदी उपस्थित होते.

बीड जिल्ह्यात आज 19 पॉझिटीव्ह

बीड दि. 15 (सिटीझन):- प्रलंबीत असलेल्या स्वॅबचा अहवाला जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. 470 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी तब्बल 19 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर 451 रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. बीडमधील 7, परळी 6, गेवराई 2, आष्टी 1, माजलगाव 1, अंबाजोगाई 2 या प्रमाणे 19 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान माजलगाव तालुक्यातील एका बलात्कार प्रकरणातील आरोपीही  कोरोना पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य प्रशासनाने पीडितेला ताब्यात घेतले आहे.

----------

बीड जिल्ह्यात आज 17 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 17 पॉझिटिव्ह 

बीड दि.8 (सिटीझन )कोविड 19 च्या निश्चित निदानासाठी जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आज बुधवारी 262 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बीडमधील सर्वाधिक 96 स्वॅबसह अन्य रुग्णालयातील स्वॅबचा  समावेश होता. एकूण 263 पैकी 17 पॉझिटिव्ह आले आहेत. 238 रिपोर्ट निगेटिव्ह तर 7अनिर्णित आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णाचा आकडा वाढू लागला आहे. 

बीड जिल्ह्याचे टेन्शन वाढले ; आज 13 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्याचे टेन्शन वाढले, आज13 पॉझिटिव्ह 

बीड दि.7 (सिटीझन )कोविड 19 च्या निश्चित निदानासाठी जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आज मंगळवारी 288 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बीडमधील सर्वाधिक 106 स्वॅबसह  , परळी, माजलगाव, आष्टी, गेवराई , केज आणि अंबाजोगाई येथील स्वॅबचा  समावेश होता. एकूण 288  पैकी 13 पॉझिटिव्ह आले आहेत.  273 रिपोर्ट निगेटिव्ह तर 2  अनिर्णित आहेत. आतापर्यंत एका दिवसाचा पॉझिटिव्हचा आकडा 9 पर्यंत होता मात्र आज हा आकडा 13 पर्यंत गेला आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत आहेत.

बीड जिल्ह्यात आज 3 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 3 पॉझिटिव्ह 

बीड दि.6 (सिटीझन )कोविड 19 च्या निश्चित निदानासाठी जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आज सोमवारी 197 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बीड , परळी आणि अंबाजोगाई येथील स्वॅबचा  समावेश होता. एकूण 197 पैकी 3 पॉझिटिव्ह तर 186 .रिपोर्ट निगेटिव्ह तर  8 अनिर्णित आहेत. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेलले कोरोना मीटर आजही सुरूच आहे. मात्र बीड शहरात एकही रुग्ण आज आढळला नाही.

बीड जिल्ह्यात आज 6 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 6 पॉझिटिव्ह 

बीड दि.5 (सिटीझन )कोविड 19 च्या निश्चित निदानासाठी जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आज रविवारी 248 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बीड , परळी आणि अंबाजोगाई येथील स्वॅबचा सर्वाधिक समावेश होता. एकूण 248 पैकी 6 पॉझिटिव्ह तर 239.रिपोर्ट निगेटिव्ह तर 3 अनिर्णित आहेत. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेलले कोरोना मीटर आजही सुरूच आहे

गेवराईतील ' या ' भागात पूर्णवेळ संचारबंदी

गेवराईतील या भागात पुर्णवेळ संचारबंदी

गेवराई दि.5 (सिटीझन)

गेवराई येथील इस्लामपुरा भागातील एक रूग्ण अहमदनगर येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. त्याच्यावर बीड जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या अनुशंगाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गेवराई शहरातील काही भागात पुर्णवेळ संचारबंदी लागु केल्याचे आदेश आज दुपारी काढले आहेत.

परळी शहर आजपासून पूर्ण लॉकडाऊन

परळी आजपासून 8 दिवस लॉकडाऊन 

बीड दि.5 (सिटीझन ) परळी शहरातील शहरातील स्टेट बैंक ऑफ इंडिया येथील पाच अधिकारी/ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परळी शहर आजपासून 8 दिवस म्हणजेच दि.12 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत पुर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश मध्यरात्री काढण्यात आले. 

Pages