बीड शहर

बीड जिल्ह्यात आज पुन्हा 5 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज पुन्हा 5 पॉझिटिव्ह 

बीड दि.21 ( सिटीझन ) जिल्ह्यातून आज 31 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले असून 31 पैकी 5 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून अन्य 23 निगेटिव्ह आले आहेत. 5 पैकी 4 पॉझिटिव्ह पाटोदा येथील तर 1 बीड शहरातील शहेंशाह नगर येथील 1 रुग्णाचा समावेश आहे. पाटोदा येथील 4 पॉझिटिव्ह बीड शहरातील छोटी राज गल्ली येथील रुग्णाच्या क्लोज संपर्कात आल्या होत्या अशी माहिती आहे. 

बीडला धक्का आज 9 पॉझिटिव्ह

बीडला धक्का आज 9 पॉझिटिव्ह 

बीड दि.20 ( सिटीझन ) जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आज शनिवारी 77व्यक्तींचे स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यापैकी 9 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून अन्य 68 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.आजच्या 9 पॉझिटिव्ह पैकी 7 बीड शहरातील असून 2 धारूर तालुक्यातील चिंचपूर येथील आहेत.  बीड शहरातील बशीरगंज 4 , शहेंशाह नगर 1 आणि झमझम कॉलनी 1 अशा एकूण 6 रुग्णाचा समावेश आहे. एकाच वेळी 6 रुग्ण बीड शहरात आढळल्याने खळबळ उडाली आहे.

कोविड १९-बीड अपडेट - २०/जून/२०२०
आज पाठविलेले स्वॅब - ७७
निगेटिव्ह अहवाल - ६८
पॉजिटिव्ह अहवाल - ०९

बीड जिल्ह्यातील सर्व 36 रिपोर्ट निगेटिव्ह

बीड (प्रतिनिधी) कोरोनाच्या निश्चित निदानासाठी आज गुरुवारी (दि.18) बीड जिल्ह्यातील 36 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातून 24, बीड कोव्हीड केअर सेंटरमधून 6, अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातून 1, गेवराई उप जिल्हा रुग्णालय 3 व अन्य 2 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश होता.सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

बीड - आय मिस यु मॉम , डॅड लिहून त्याने आयुष्य संपवलं !

 

बीड दि.18 ( सिटीझन ) आय मिस यु मॉम , डॅड .... नाना पोरीला सांभाळा असे लिहून एका विवाहित तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना कामखेडा ( ता.बीड ) येथे आज सकाळी उघडकीस आली. 

बीड: धक्का , आजचे 2 पॉझिटिव्ह

बीड दि.15 ( सिटीझन ) बीड जिल्हयातील आज सोमवारी एकूण 68 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचे अहवाल आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. आज 2 पॉझिटिव्ह तर 66 रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दोन्ही रुग्ण बीड शहरातील असल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. दोन्ही पूर्वीच्या बाधीत व्यक्तींच्या संपर्कातील असावेत असा अंदाज आहे.

 

बीड जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह

बीड दि.15 ( सिटीझन ) येथील जिल्हाधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यासंदर्भात स्वतः बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीच याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. 

बीड येथील जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी यांचा अंबाजोगाई येथील प्रयोगशाळा उदघाटनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री यांच्याशी संपर्क आला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले होते. आज पहाटे जिल्हाधिकारी यांच्यासह वैद्यकीय अधिष्ठाता आणि एसडीओ, अंबाजोगाई यांच्या स्वॅब चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यामुळे प्रशासनासह सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.

ना. धनंजय मुंडे म्हणाले, कोणालाही त्रास झालेला मला बरा वाटणार नाही !

माझ्यावर प्रेम करणाऱ्या कोणालाही त्रास झालेला मला बरा वाटणार नाही - अन्नत्याग, नवस, पायी वारी करणाऱ्या समर्थकांना धनंजय मुंडेंचे कोरोना वॉर्डातून आवाहन!

मुंबई दि.14 ( सिटीझन ): राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी राज्यभरातुन त्यांचे समर्थक प्रार्थना, नवस, अन्नत्याग, पायी वाऱ्या करत आहेत; धनंजय मुंडे यांनी थेट कोरोना वॉर्डातून आपल्या या समर्थकांना असे काहीही न करण्याचे आवाहन केले आहे.

बीड : आतापर्यंत 93 निगेटिव्ह इतर रिपोर्ट रात्री येणार

बीड दि.14 ( सिटीझन ) जिल्ह्यातून आज रविवारी पाठवण्यात आलेल्या 136 व्यक्तींच्या स्वॅबपैकी 93 स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून अन्य 43 रिपोर्ट आज रात्री 8 वाजेपर्यंत प्राप्त होतील अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आज तब्बल 136 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात दिलासा मिळाला असून एकही रिपोर्ट पॉझिटिव्ह नाही. आता अन्य 43 रिपोर्टसाठी रात्रीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

बीड : आज पुन्हा 2 नवे पॉझिटिव्ह

 

बीड दि.12 ( सिटीझन ) जिल्ह्यातून आज शुक्रवारी पाठवण्यात आलेल्या 44 व्यक्तींच्या स्वॅबपैकी 2  रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. तर अन्य 39 रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 3 जणांचे अहवाल रिजेक्टेड असल्याची महिती  जिल्हा प्रशासनाने सांगितले. सदरील 2 पॉझिटिव्ह रुग्ण हे बीड तालुक्यातील आहे.दोन्ही पुरुष असून 1 लोळदगाव आणि 1 बाभूळखुंटा येथील आहेत.  दरम्यान तीन दिवसांत तब्बल 8 पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. 

■ कोविड 19-बीड अपडेट - 12 जून ■ 

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न ; बैठक लांबली

 

आ.सोळंकेंचा अविश्वासाचा डाव पुन्हा लांबणीवर.

नगरसेवकांना फिरावं लागलं वापस.

राज गायकवाड-माजलगाव.

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना

 

मुंबई ( प्रतिनिधी )  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते. दरम्यान बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दि.8 जून अंबाजोगाई येथील कोरोना चाचणी प्रयोगशाळेचेही उदघाटन केले होते.

बीड : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ; दुकाने सुरू मात्र हॉटेल्स, धार्मिक स्थळे बंदच

बीड दि.1 जून ( सिटीझन ) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ' मिशन बिगीन अगेन ' अंतर्गत अनलॉक 5 संदर्भातील आदेश रविवारी रात्री काढले आहेत. यामध्ये दि.31 मे 2020 ते 30 जून 2020रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत. दुकाने पूर्वी प्रमाणेच सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.30 यावेळेत  सुरू राहणार असून धार्मिक स्थळे, हॉटेल्स बंदच राहणार आहेत. विवाहासाठी 50 तर अंत्यविधीसाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध राहील.

बीड जिल्ह्यात खालील गोष्टी बंद ( प्रतिबंधित ) असतील.
 
■ शाळा ,महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग इ.

बीड : आज पुन्हा 1 पॉझिटिव्ह तर 37 रिपोर्ट निगेटिव्ह

बीड दि.30 ( सिटीझन ) बीड जिल्ह्यातून आज शनिवारी 38 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 37 रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 1 पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  प्रशासनाने दिली आहे.  आजच्या 1 रुग्णांमुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 50 + 1 अशी 51 झाली आहे. 

बीड शहरातील कर्फ्यु रद्द ; आजपासून सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत दुकाने खुली

 

बीड दि.30 ( सिटीझन ) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिनांक 30 मे रोजी पहाटे 2 वाजता नवीन आदेश काढून बीड शहरासह बारा गावातील पूर्ण कर्फ्यू रद्द केला आहे. कंटेनमेंट झोनमधील संचारबंदी कायम ठेवत शहरातील कर्फ्यू रद्द करण्यात आला असून आज दिनांक 30 मे पासुन शहरातील सर्व दुकाने पूर्वीप्रमाणे म्हणजेच सकाळी 7.30  ते सायंकाळी 6.30 पर्यंत सुरु राहतील असे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर बीड शहरातील बालेपीर भागाचा काही परिसर कंटेनमेंट झोन घोषित केला आहे.

बीड :1 पॉझिटिव्ह रिपोर्ट तर अन्य एक प्रलंबित

बीड दि.29 ( सिटीझन ) बीड जिल्ह्यातून आज शुक्रवारी  118 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 116 रिपोर्ट निगेटिव्ह आले होते तर 2 प्रलंबित होते. त्या 2 पैकी 1 पॉझिटिव्ह आला असून अन्य एक प्रलंबित असल्याची माहिती  प्रशासनाने दिली आहे.  आजच्या 1 रुग्णांमुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 49 + 1 अशी 50 झाली आहे. 

Pages