बीडला धक्का आज 9 पॉझिटिव्ह

बीडला धक्का आज 9 पॉझिटिव्ह 

बीड दि.20 ( सिटीझन ) जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आज शनिवारी 77व्यक्तींचे स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यापैकी 9 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून अन्य 68 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.आजच्या 9 पॉझिटिव्ह पैकी 7 बीड शहरातील असून 2 धारूर तालुक्यातील चिंचपूर येथील आहेत.  बीड शहरातील बशीरगंज 4 , शहेंशाह नगर 1 आणि झमझम कॉलनी 1 अशा एकूण 6 रुग्णाचा समावेश आहे. एकाच वेळी 6 रुग्ण बीड शहरात आढळल्याने खळबळ उडाली आहे.

कोविड १९-बीड अपडेट - २०/जून/२०२०
आज पाठविलेले स्वॅब - ७७
निगेटिव्ह अहवाल - ६८
पॉजिटिव्ह अहवाल - ०९

■ २- २१ वर्षे पुरूष व २२ वर्षे महिला - रा.झमझम कॉलनी, बीड
■ १ -  २६ वर्षे महिला - रा. शहेनशहा नगर, बीड
■ ४ - ४० वर्षे पुरूष, ३४ वर्षे स्त्री, १० वर्षे मुलगा, ७ वर्षे मुलगा - रा.बशिरगंज, बीड
■२  - ३१ वर्षे महिला,  ८ वर्षे मुलगा -  रा.चिंचपूर ता.धारूर (औरंगाबादहून आलेले)

सदरील माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.