बीड शहर

बीड जिल्ह्यातील शाळा आता 31 मार्चपर्यंत बंद - जिल्हाधिकारी

बीड जिल्ह्यातील शाळा 31 मार्चपर्यंत बंद

बीड दि.10 ( प्रतिनिधी ) कोरोनाचा वाढत्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील दहावी आणि बारावी वगळता 5 वी ते 9 वी आणि 11 वीचे वर्ग दहा मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी यापूर्वीच दिले होते. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील सर्व शाळा ( दहावी ,बारावी वर्ग वगळून ) दि.31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज दि. 10 मार्च रोजी काढले आहेत. 

बीड जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना अँटिजेन टेस्ट करण्याचे आदेश

बीड जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना अँटिजेंन टेस्ट करण्याचे आदेश - जिल्हाधिकारी 

बीड जिल्ह्यातील सर्व शिवालये महाशिवरात्रीच्या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश

बीड दि.6 ( प्रतिनिधी )  जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक 11 मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व शिवालये दर्शनासाठी पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज दिले आहेत. सदरील कालावधीत प्रथेप्रमाणे पूजा व इतर बाबी संबंधित पुजारी व विश्वस्त यांनी कोरोना विषयक नियमाचे पालन करून करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर येथील दर्शन दिनांक 8 मार्च ते 16 मार्च या कालावधीत पूर्णतः बंद करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी जगताप यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

मोटार सायकलचा कट मारल्याच्या कारणावरुन युवकावर धारदार शस्त्राने हल्ला.

माजलगाव (प्रतिनिधी) 
मोटार सायकलचा कट मारण्याच्या कारणावरून युवकात झालेल्या बाचाबाचीत एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.ही घटना शहरातील महात्मा फुले शाळेच्या पाठी मागील रोडवर शुक्रवार दि 5 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

बीड जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार , कोचिंग क्लासेस 31 मार्च पर्यंत बंद -जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बीड दि.5 ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील कोरोनाविषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज दिनांक 5 मार्च रोजी नवीन आदेश जारी केले आहेत. आजपासून दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार,  कोचिंग क्लासेस ( दहावी बारावी वगळून ) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व यात्रा, मोर्चे ,आंदोलने, उपोषण यांना देखील बंदी घालण्यात आली आहे .सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर करून भाजीपाला व फळ विक्रीला परवानगी देण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील शाळा 10 मार्चपर्यंत बंद

बीड ( प्रतिनिधी ) कोरोनाचा वाढत्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील दहावी आणि बारावी वगळता 5 वी ते 9 वी आणि 11 वीचे वर्ग दहा मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज दिले आहेत.

लॉकडाऊन संदर्भात आठ दिवसात निर्णय - मुख्यमंत्री

राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना उद्यापासून बंदी - मुख्यमंत्री ठाकरे 

लॉकडाऊनसाठी आठ दिवसांचा अल्टिमेट

'त्या' विहिरीने आज पुन्हा दोघांचे बळी घेतले

बीड ( प्रतिनिधी ) दोन दिवसांपूर्वीच  भरधाव कार विहिरीत पडल्याने बीड शहरातील दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. आज रविवारी पहाटे पुन्हा त्याच विहिरीत  भरधाव आय ट्वेन्टी कार कोसळल्याने दोघे ठार झाल्याची घटना जालना - चिखली रोडवर घडली. गाडीतील अन्य तिघे बचावले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही मयत वाशीम जिल्ह्यातील असून त्यात एका महिलेसह लहान मुलीचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. गाडी विहिरीबाहेर काढण्यात आली आहे.

बीड शहरातील हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये अर्भक सापडल्याने खळबळ

बीड ( प्रतिनिधी ) शहरातील जालना रोडवरील एका खाजगी हॉस्पिटलच्या स्वच्छता गृह ( टॉयलेट ) मध्ये एक पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे.
बीड मधील जालना रोडवरील वीर हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये नवजात अर्भक मिळाल्याची माहिती कळताच शहर ठाण्याचे पोलीस त्याठिकाणी दाखल झाले आहेत. सदरील अर्भक पुरुष जातीचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. टॉयलेटमध्ये अर्भक कसे आले याचा तपास सुरू आहे. दरम्यान एक महिला रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी आली होती.बाथरूममधून आल्यानंतर ती महिला परत घरी गेल्याचे हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे नेमका प्रकार काय हे आता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

मोटरसायकलच्या धडकेत 2 ठार ;2 जखमी.

पाथरी रोड वरील दुगड पंपासमोरील घटना.
 राज गायकवाड माजलगाव.

पाथरी कडून माजलगाव कडे येणाऱ्या एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात एका मोटरसायकलने समोरून येणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले आहेत तर दोन जण याठिकाणी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दुघड पेट्रोल पंपासमोर महामार्ग 222 वर पाथरी कडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवार दि.30 रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडली.

केजीएन ग्रुपच्या वतीने उद्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

बीड ( प्रतिनिधी ) येथील खाजा गरीब नवाज ग्रुप सेवा भावी संस्थेच्या वतीने सय्यद मो. जहिरोद्दीन  सलीमोद्दीन कादरी यांनी रुग्णसेवा करण्याच्या उद्देशाने प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या दि.26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा रुग्णालय येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांच्या हस्ते आणि सायं. दै. सिटीझनचे संपादक शेख मुजीब , हाजी शफीक तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात येणार आहे.

राज्यातील शाळा दि.27 जानेवारी पासून सुरू होणार - शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

मुंबई - राज्यातील 5 वी ते 8 वीचे वर्ग दि.27 जानेवारी पासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. कोरोना विषयक नियमावलीचे पालन करून प्रत्यक्ष पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
सध्या राज्यात केवळ 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. मात्र आता दि. 27 जानेवारी 2021 पासून इयत्ता 5 वी ते 8 पर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याने तब्बल दहा महिन्यांनंतर शाळा गजबजणार आहेत.

सावध : बीड जिल्ह्यातील ' त्या ' कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने

बीड दि.11 ( प्रतिनिधी ) देशातील काही राज्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. महाराष्ट्रातही कोंबड्या आणि कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लू ने झाल्याचे समोर आले आहे.मुंबई,  ठाणे, परभणी ,दापोली आणि बीड जिल्ह्यातील कोंबड्या व कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लू पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मत्स्यपालन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रालय , नवी दिल्ली यांनी दिला आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे 26 कावळे मृतावस्थेत आढळून आले होते. त्यापैकी तीन कावळ्यांचे मृत अवशेष तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

बीडमध्ये पत्रकार संघाच्या कार्यक्रमात डॉ.थोरात यांचे मार्गदर्शन

बीड, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने येथील स.मा.गर्गे भवनात दर्पनदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पुजन झाले. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी कोरोनामध्ये माध्यमांची भुमिका याविषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार काझी हयातुल्ला आणि बेदरकर यांना सन्मानित करण्यात आली.

वृक्षांना दिली पत्रकारांची नावे दर्पनदिनी मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम

बीड, (प्रतिनिधी):- बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दर्पनदिनी आगळावेगळा उपक्रम राबवून वृक्षसंवर्धनाचे महत्व पटवून देण्यात आले. यावेळी वृक्ष नामकरण सोहळ्यात विविध प्रकारच्या वृक्षांना दिवंगत पत्रकारांची नावे देण्यात आली.

शेतकर्‍याला विजेच्या खांबाला बांधून विष पाजले 12 जणांविरुध्द गुन्हा दाखल

बीड, (प्रतिनिधी):- शेतातील पाईप एकत्र करत असतांना दहा ते बारा जणांनी एका 42 वर्षीय शेतकर्‍याला काठी, चप्पल, बुट आणि दकडाने मारहाण करून रस्त्याने फरपटत ओढत नेले. विद्युत खांबाला दोरीने बांधून नंतर त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि नंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने विष पाजल्याची घटना युसुफवडगाव शिवारात घडली. याप्रकरणी 12 जणांविरूध्द  कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

गेवराई बायपासवर वाहनधारकांना लुटीचे प्रकार वाढले; मध्यरात्री दोघांना लुटले, पोलिसांचे दुर्लक्ष

बीड, (प्रतिनिधी):- गेवराई शहराबाहेरून जाणार्‍या बायपास रोडवर वाहन धारकांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. काल मध्यरात्री काही वाहनधारकांना मारहाण करून लुटल्याची घटना घडली. त्यापैकी दोन वाहनधारक गेवराई पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याचे सुत्रांनी सांगितले. यापुर्वीही बायपास रोडवर अनेकदा असे प्रकार घडले आहेत. मात्र स्थानिक पोलिस त्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी याप्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी होवू लागली आहे.

Pages