बीड शहर

गुरूंच्या विरहाने सेवकानेही घेतला जगाचा निरोप !

गुरूंच्या विरहाने सेवकानेही घेतला जगाचा निरोप !

माजलगांव मठाचे शिष्य विलासअप्पा शेटे यांचे निधन

सायंकाळी ६ वाजता वीरशैव रूद्रभूमीत समाधीविधी

क्रुझरजीप मोटरसायकलच्या धडकेत मोठेवाडीचा युवक ठार.

माजलगाव प्रतिनिधी दि.8

भरधाव वेगातील क्रुझर जीपने मोटार सायकलला दिलेल्या जोरदार धडकेत मोठेवाडीचा युवक जागीच ठार झाला. अशी घटना बुधवार दि. 8 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली.

पंकजा मुंडेंचे सूचक ट्विट ; परळी सुन्न आहे , मान खाली गेली आहे राज्याची !!

पंकजा मुंडेंचे सूचक ट्विट ; परळी सुन्न आहे , मान खाली गेली आहे राज्याची !!

बीड दि.7 ( प्रतिनिधी ) भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी परळीतील प्रकरणावर आज प्रथमच ट्विट करत सूचक वक्तव्य केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले  आहे की,
 " अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये,wrong president should not be set!ही काळाची गरज आहे,परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची !! "
अशा प्रकारचे ट्विट पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.

सिरसदेवी येथे भिंत पडून राधाबाई मिसाळ यांचे निधन

*अतिवृष्टी पावसाने घेतला एका 65 वर्षाची महिलांचा बळी*
========================

तलवाडा  प्रतिनिधी 

बीड जिल्ह्यातील दुकाने आता रात्री 10 पर्यंत सुरू राहणार ; नवीन आदेश आले

बीड जिल्ह्यातील दुकाने आता रात्री 10 पर्यंत सुरू राहणार ; नवीन आदेश आले 

 

बीड दि.14 ( प्रतिनिधी ) ब्रेक द चैन अंतर्गत जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी आज नवीन आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील दुकाने रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. सदर आदेशाची  दि.15 ऑगस्ट पासून अंमलबजावणी होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

 

बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आजच्या आदेशात म्हटले आहे की, 

उपहारगृहे खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने खालील अटीच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे . 

नेकनूरच्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

नेकनूरच्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू 

बीड ( प्रतिनिधी ) विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बीड तालुक्यातील नेकनूर येथील सय्यद सलमान सय्यद रज्जाक ( वय 22 ) हा दुपारी बीड रोडवरील एका विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता मात्र त्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 

बीडच्या जिल्हाधिकारीपदी राधाबिनोद शर्मा

बीडच्या जिल्हाधिकारीपदी राधाबिनोद शर्मा 

बीड ( प्रतिनिधी ) बीड जिल्हाधिकारी पदी राधाबिनोद अरीबम शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले शर्मा यांना बीड जिल्हाधिकारी पदाचा चार्ज घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर सचिव सुजाता सैनिक यांनी याबाबतचे आदेश आज काढले असून नूतन जिल्हाधिकारी शर्मा यांना तातडीने रुजू होण्याबाबत आदेशात कळविण्यात आले आहे.

कोरोना शासनादेश झुगारनाऱ्या 50 व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई.

 

महसूल पोलीस पालिका प्रशासनाची संध्याकाळी शहरात कडक मोहीम सुरु.

माजलगाव प्रतिनिधी दि.2

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कोरोना महामारी रोखण्यासंदर्भात नियमावली तयार केली आहे.परंतु या नियमांना झुगारत शहरात मोठ्या प्रमाणात व्यापारी आपला व्यवसाय सुरु ठेवून शासनआदेश पाळत नसल्याने महसूल पोलीस पालिका प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवत शहरात संध्याकाळी 50 दुकानांवर दंडात्मक कारवाई केली. तरी या मोहिमेदरम्यान अनेक दुकाना सील केल्या.या मोहिमेने शहरात व्यापाऱ्यांमध्ये धांदल उडाली आहे.

मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या उचलबांगडीच्या हालचाली? शुक्रवारी नगरपरिषदेच्या विशेष सभेत घेतला जाणार निर्णय.

माजलगाव नगरपरिषदेचे कार्यरत मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या उचलबांगडीच्या हालचालींना वेग आला असल्याची विश्वसनीय माहिती आहे.सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी शुक्रवार दि.30 रोजी विशेष सभा बोलावली आहे.या सभेच्या पटलावर इतर विषय असले तरी सभा बोलावन्या मागचा मुख्य उद्देश मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या उचलबांगडीचा असल्याचा सूर नगरसेवकांमधून ऐकायला मिळत आहे.

 

बीड जिल्ह्यात पीएसआयला 80 हजाराची लाच घेतांना पकडले

 बीड ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील अंभोरा ( ता.आष्टी ) येथील पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे यांना 80 हजाराची लाच घेतांना पकडण्यात आले. औरंगाबाद येथील एसीबीने आज ही कारवाई केली.

 

बीड जिल्ह्यातील तीन तालुक्यात आता कडक निर्बंध ; वेळ कमी केली

बीड दि.18 ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील आष्टी , पाटोदा,  गेवराई तालुक्यांमध्ये कोवीड -19 विषाणूचा प्रार्दुभाव त्वरित ओटाक्यात आणणे आवश्यक आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेता संभाव्य रुग्ण संख्या व उपलब्ध वैद्यकीय संसाधनांचा विचार करता . रुग्ण संख्या नियंत्रित करणे हे अत्यंत आवश्यक आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आज नवीन आदेश काढले आहेत.सदर आदेशाची अंमलबजावणी सोमवार दि.19 जुलै पासून होणार असून हे नियम दि.28 जुलै पर्यंत राहणार आहेत. तिन्ही तालुक्यात आता वेळ कमी करण्यात आली आहे. 

 

बीड जिल्ह्यातील तीन तालुक्यात आता कडक निर्बंध ; वेळ कमी केली

बीड दि.18 ( प्रतिनिधी ) जिल्ह्यातील आष्टी , पाटोदा,  गेवराई तालुक्यांमध्ये कोवीड -19 विषाणूचा प्रार्दुभाव त्वरित ओटाक्यात आणणे आवश्यक आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेता संभाव्य रुग्ण संख्या व उपलब्ध वैद्यकीय संसाधनांचा विचार करता . रुग्ण संख्या नियंत्रित करणे हे अत्यंत आवश्यक आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आज नवीन आदेश काढले आहेत.सदर आदेशाची अंमलबजावणी सोमवार दि.19 जुलै पासून होणार असून हे नियम दि.28 जुलै पर्यंत राहणार आहेत. तिन्ही तालुक्यात आता वेळ कमी करण्यात आली आहे. 

 

थरार सीसीटीव्हीत कैद ; वेळीच सावध राहिल्याने वाचले तरुणाचे प्राण, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

गेवराई, (प्रतिनिधी):-जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर भरदुपारी गोळीबार करण्यात आला. मात्र सदरील तरुणाचे दैव बलवत्तर व वेळीच सतर्कता दाखविल्याने गोळीबारात तरुणाचे प्राण वाचले. हि घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली असून हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहावीचा निकाल 99.95 टक्के

मुंबई, (प्रतिनिधी):-करोनाच्या दुसर्‍या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज, शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दुपारी एक वाजता विद्यार्थी निकाल ऑनलाइन पाहू शकणार आहेत. दहावीच्या निकालात कोकणाने बाजी मारली असून 100 टक्के निकाल लागला आहे.

Pages