दहावीचा निकाल 99.95 टक्के

मुंबई, (प्रतिनिधी):-करोनाच्या दुसर्‍या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज, शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दुपारी एक वाजता विद्यार्थी निकाल ऑनलाइन पाहू शकणार आहेत. दहावीच्या निकालात कोकणाने बाजी मारली असून 100 टक्के निकाल लागला आहे. राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 2021 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावी चा निकाल जाहीर आज शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्यात नऊ विभागीय मंडळाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. सर्वात जास्त निकाल 100 टक्के कोकण विभागाचा लागला असून सर्वांत कमी निकाल 99.84 टक्के नागपूर विभागाचा आहे.
राज्यातील नऊ विभागांचा 99.95 टक्के निकाल लागला आहे. यापैकी कोकण विभागाचा 100 टक्के, अमरावती 99.98 टक्के, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, लातूर या विभागांचा निकाल 99.96 टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल 99.92 टक्के तर सर्वात कमी 99.84 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.
राज्यात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून दहावीच्या 27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यावर्षी नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 75 हजार 806 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 75 हजार 752 विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 99.95 आहे.
यंदा या परीक्षेसाठी आठ माध्यमांतील 9 लाख 9 हजार 931 मुले तर 7 लाख 78 हजार 693 मुली असे एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी प्रविष्ट होते. लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे ती रद्द करण्यात आली.
इयत्ता 10वीच्या परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 35 टक्के गुण आवश्यक असतात, मात्र अंतर्गत गुणांच्या मूल्यमापनावर 20 टक्के गुण मिळणारे विद्यार्थीही उत्तीर्ण असतील. ज्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांना गुणपत्रक दिले जाईल जे विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या शाळांमधून दिले जाऊ शकते

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.