अंबाजोगाई

जिल्हा निर्मितीसाठी अंबाजोगाईत निघाली रॅली

अंबाजोगाई : बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी, या मागणीसाठी अंबाजोगाईतील सर्व पक्ष व संघटना बुधवारी सकाळी एकत्र आल्या होत्या. रॅलीतून जिल्हा निर्मितीच्या घोषणा देत उपजिल्हाधिका-यांना दोन हजार नागरिकांच्या स्वाक्ष-यांचे निवेदन देण्यात आले.

अंबाजोगाई तालुक्यात गारपिट; पिकांना तडाखा

अंबाजोगाई (प्रतिनिधी) दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर आज सांयकाळी अंबाजोगाईत ठिकठिकाणी गारपीट झाली. अंबाजोगाई तालुक्यासह अन्य ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे पिकांना मोठा तडाखा बसला आहे. रब्बीच्या अन्य पिकांनाही मोठा फटका बसला आहे.

न.प.प्रशासनात राहिली नाही शिस्त, ट्रॅफिक झाली बेशिस्त

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी असले ली जुनी पाईप लाईनवर सिमेंट, कळु, राखेचे ट्रक गेल्यामुळे पन्नास वर्षापुर्वी टाकलेली पाईप लाईन दुरूस्तीच्या नावाखाली खड्डे खोदुन आठ दिवस झाले तरी खड्डा न बुजवल्याने शाळकरी मुले, मुली, तसेच दुचाकीस्वारांना धोका निर्माण झाला असला तरी न.प.प्रशासनास ट्रॅकीक बेशिस्त झाली आहे. 

कॉंग्रेसकडून विधानपरिषदेसाठी पापा मोदींची चाचपणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी राजकीय वजन वापरण्याचा प्रयत्न

अंबाजोगाई (प्रतिनिधी) लातुर, बीड, उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य मतदार संघातून सलग दोन वेळा आमदार होणारे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची येत्या एप्रिल-मे मध्ये मुदत संपत असल्याने ते निवडणूक लढवणार नसल्याने त्यांच्या जागी आपणास पक्षाने उमेदवारी दिल्यास खात्रीने निवडून येऊ शकतो असा विश्वास निर्माण करत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचे विश्‍वासु सहकारी म्हणून प्रदेश कॉंग्रेसमध्ये मोदींची चलती आहे.

अंबाजोगाई येथील खडी केंद्रातील खोदकामाची तपासणी सुरू

अंबाजोगाई : तालुक्यातील खडी केंद्र चालकांनी अवैधरित्या खोदकाम केलेल्या खदाणीची तपासणी भूमी अभिलेख व महसूल प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. नियमानुसार खोदकाम केले नसेल तर या खडी केंद्रांना नव्या नियमानुसार पाचपट दंड ठोठावण्यात येणार आहे.

अंबाजोगाई पोलिसांनी दोन दारूभट्ट्या केल्या उध्वस्त हजारो रुपयांचे गुळमिश्रित रसायन केले नष्ट— अारोपी फरार

पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे याची कारवाई

अंबाजोगाई : अंबाजोगाई : ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळी कुरणवाडी परिसरातील वान नदीच्या पात्रातील बेकायदेशीर दारूभट्ट्यांवर कारवाई करत दोन भट्ट्या उध्वस्त केल्या आणि हजारो लिटर रसायन नष्ट केले.

अंबाजोगाई बसआगार प्रमुख कुरेशीआणि वाहक जैस्वाल करप्शनच्या जाळ्यात

अंबाजोगाई : अंबाजोगाई : टायर खराब झाल्याच्या चौकशीतून बस चालकास सुखरूप बाहेर काढण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अंबाजोगाई बस आगार प्रमुख कुरेशी महंमद जफर फकर आणि वाहक नंदकुमार जैस्वाल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रात्री अंबाजोगाई शहरातील शिवाजी चौकातील एका व्यापारी संकुलाच्या परिसरात रंगेहाथ पकडले.

अंबाजोगाई जिल्हा न्यायालयातील स्ट्राँग रूम चोरट्यांनी फोडली

अंबाजोगाई ( बीड ) : शहरातील जिल्हा व सत्र न्यायलयातील स्ट्राँग रूम चोरट्यांनी काल रात्रीच्या सुमारास फोडली. चोरट्यांनी थेट न्यायालयात चोरी करण्याची हिम्मत केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

लातूर येथे 9,10 व 11 फेब्रुवारी रोजी 2 रे आदिवासी धनगर साहित्य संमेलन -अंबाजोगाईत बैठक

अंबाजोगाई (प्रतिनिधी) आदिवासी धनगर साहित्य परिषद आयोजित दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे 9,10 व 11 फेब्रुवारी 2018 असे तीन दिवस डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क,लातूर येथे आयोजित करण्यात आले असून या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी करण्यात येत आहे.या संमेलनात जास्तीत जास्त रसिक,श्रोते व समाज बांधवांनी सहभागी होवून तीनही दिवस उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Pages