कॉंग्रेसकडून विधानपरिषदेसाठी पापा मोदींची चाचपणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी राजकीय वजन वापरण्याचा प्रयत्न

अंबाजोगाई (प्रतिनिधी) लातुर, बीड, उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य मतदार संघातून सलग दोन वेळा आमदार होणारे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची येत्या एप्रिल-मे मध्ये मुदत संपत असल्याने ते निवडणूक लढवणार नसल्याने त्यांच्या जागी आपणास पक्षाने उमेदवारी दिल्यास खात्रीने निवडून येऊ शकतो असा विश्वास निर्माण करत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचे विश्‍वासु सहकारी म्हणून प्रदेश कॉंग्रेसमध्ये मोदींची चलती आहे. त्यामुळेच पक्षाकडूनही मोदींच्या उमेदवारी संदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार होवू शकतो अशीही चर्चा राजकिय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
मोदी यांनी अनेक वर्ष स्वतः नगराध्यक्षच नव्हे स्व.विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मराठवाड्यातील नगर परिषदांच्या अध्यक्ष संघटनेचे मराठवाडा प्रमुख होते. पणन महासंघ सारख्या संघाचे उपाध्यक्ष व सदस्यपदी कार्यरत आहेत. विशेष म्हणजे दिलीपराव देशमुखांच्या दोन्हीही निवडणूकीत मतदारांना संपर्क करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. बीड जिल्ह्यातून दरवेळी मोदींनी देशमुखांना मताधिक्य दिले आहे. केज विधानसभेच्या मुंदडा जशा सलग आमदार म्हणून निवडून येत होत्या, तिच हॅट्रीक नगराध्यक्षपदाच्या निवडणूकी संदर्भात मोदींनी पार केली. थेट जनतेतून निवड असो की नगरसेवकांतून मोदीच्या शिवाय नगराध्यक्ष पदावर कोणी विराजमान झाले नाही. आता शहराच्या राजकारणासोबत कॉंग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्षपद माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी दिले. भविष्यात विधान परिषदेसाठी तिकीट मागितले तर प्रदेशाध्यक्ष नाही म्हणणार नाहीत असे मोदी समर्थकांना वाटते.
मोदीची दुसरी जमेची बाजु म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आगामी निवडणूकीच्या दृष्टीने युती झाल्याने ही जागा कॉंग्रेसकडे असल्याने ती कायम राहिली पाहिजे. यासाठी प्रदेशाध्यक्ष प्रयत्नशील आहेत. चव्हाण यांचे विश्वासू सहकारी म्हणून प्रदेश कॉंग्रेसमध्ये मोदीची सतत चालत असल्याने पक्ष मोदीच्या उमेदवारी संदर्भात सहानुभूतीपुर्वक विचार करु शकतो अशीही चर्चा आहे. मोदी व आडसकर कुटुंबाचे राजकारणापलिकडे संबंध असल्याने याचाही फायदा मोदींना होवू शकतो. भाजपामध्ये सर्वात प्रबळ दावेदार म्हणून लातूर एमआयटी कॉलेजचे रमेशअप्पा कराड व आष्टीचे माजी मंत्री सुरेश धस यापैकी कोणाला उमेदवारी मिळते यावर बरेच अवलंबून आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे पद टिकवून ठेवण्यासाठी कॉंग्रेसतर्फे दिलीपराव देशमुख निवडणूक लढवणार नसतील तर लातूर, बीड पेक्षा जास्त मते असणार्या उस्मानाबाद जिल्हयातील राष्ट्रवादीचे दिग्गज उमेदवारीसाठी देशमुख, चव्हाण यांचे एकमत होते की आयुक्तालयासारखे मतभेद होतात येणारा काळच ठरवेल. मात्र मोदी कराड, धस आपआपले राजकीय वजन वापरुन कुठल्याही परिस्थितीत आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाच्या नेतृत्वाकडे प्रयत्नशील असल्याचे दिसते.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.