अंबाजोगाई

_बी फार्मसी महाविद्यालयातील रक्तदान शिबीरात 35 विद्यार्थ्यांचे रक्तदान

----------------------------
अंबाजोगाई (प्रतिनिधी) बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी.फार्मसी महाविद्यालय अंबाजोगाई येथे फार्मा विक व राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दरवर्षी प्रमाणे याही वर्षीही रक्तदान शिबीराचे दि.5 फेब्रुवारी,सोमवार रोजी
आयोजन करण्यात आले होते.

राखेची वाहतुक करणारा ट्रक पलटला; चालक ठार

अंबाजोगाई (प्रतिनिधी) राख घेवून जाणारा ट्रक पलटल्याने झालेल्या अपघात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास गिरवली ते घाटनांदूर रस्त्यावर घडली.

पाटोदा शिवारातील बारा एकर ऊस जळाला

अंबाजोगाई (प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा शिवारातील ईश्वर लोहिया या शेतकऱ्याचा बारा एकर ऊस विद्युत पुरवठा तारांच्या स्पार्किंग मुळे जळल्या ची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

भारतीय जनता पक्षाचा विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणार-उज्जैन बनसोडे

अंबाजोगाई (प्रतिनिधी) भाजपाचे विचार व पक्षाने केंद्र व राज्य सरकार मार्फत घेतलेले लोकोपयोगी निर्णय, कार्य समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत म्हणजे तळागाळापर्यंत पोहोचविणार आहे. राज्याच्या मंञी व जिल्ह्याच्या पालकमंञी ना.पंकजाताई मुंडे, खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, आमदार.संगिता ठोंबरे,जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे,युवा मोर्चाचे बीड जिल्हाअध्यक्ष स्वप्निल गलधर यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे काम सर्वांना सोबत घेवून गतीमान करणार आहे.असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष उज्जैन गोरोबा बनसोडे यांनी केले.

मोटारसायकलच्या धडकेत मायलेकीचा मृत्यू

अंबाजोगाई , (प्रतिनिधी ):- भरधाव वेगाने गाडी चालविणार्‍या मोटारसायकल स्वाराने जोराची धडक दिल्याने रस्त्यावरून चालत कामावर निघालेल्या मायलेकी गंभीर जखमी झाल्या असून  हा अपघात शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अंबाजोगाई लोखंडी सावरगाव रोडवरील कृषी महाविद्यालयासमोर झाला.माय लेकीवर लातुर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री उशिरा दोघींची प्राणज्योत मालावली.अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयासमोर भरधाव दुचाकी स्वराने मायलेकींना उडविले.शालिनी राजेंद्र बत्तीशे (वय ३२) आणि त्यांची मु

नंदुशेठ यांच्या उपोषणास्त्राने भाजप घायाळ तर शिवसेनेच्या बाणाने निशाणा साधला सचिन मुळूक यांची मुरब्बी राजकारण्याप्रमाणे शिष्टाई!

बीड (प्रतिनिधी) केज मतदार संघातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते नंदुशेठ मुंदडा यांनी लोकहिताच्या मागण्यांसाठी उपोषणाचे हत्यार उपसले. चार दिवसाच्या उपोषण प्रक्रियेतील घडामोडी उल्लेखनीय तशाच मतदार संघातील राजकीय घडामोडींवर परिणाम करणार्‍या ठरल्या. नंदुशेठ यांच्या खांद्याला खांदा लावत त्यांचे पुत्र अक्षय मुंदडा देखील रस्त्यावर उतरले. अंबाजोगाईसह केजमध्ये उमटलेले पडसाद, आंदोलनाभोवतीचा गराडा आणि पाठींब्याचा पाऊस हे मुंदडा पिता-पुत्रांची ताकद अधोरेखीत करणारा ठरला.

नंदकिशोर मुंदडा यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सामुहिक मुंडन

 
अंबाजोगाई(प्रतिनिधी*):डॉ. विमलताई मुंदडा विचारमंचाच्यावतीने सर्वसामान्य जनतेच्या विविध मुलभुत मागण्यासाठी जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व वीस कार्यकर्तांसहीत उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालु आहे,तरीही या सरकारला जाग येत नाहीय यासाठी विचारमंचाच्यावतीने विविध आंदोलन करण्यात येत आहे  ऐकवीस जणांनी मुंडन करुन या सरकारचा जाहीर निषेध केला.

आमदारांना सेल्फी काढायला वेळ आहे मात्र शेतकर्‍यांसाठी नाही

अंबाजोगाई (प्रतिनिधी) जनतेच्या विविध प्रश्‍नासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली चार पाच दिवसांपासून तुम्हा आम्हा सर्वांचे ज्येष्ट नेते नंदकिशोर मुंदडा व काही कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. मात्र या प्रश्‍नाकडे प्रशासन व सरकारला वेळ नाही. केजच्या स्थानिक आमदारांना आमिर खान सोबत सेल्फी काढायला वेळ आहे. मात्र शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी बैठक घ्यायला वेळ नाही असा घणाघाती हल्ला युवक नेते अक्षय मुंदडा यांनी केला.

अंबाजोगाईकरांचेही शुभकल्याण! ;तीन कोटींचा गंडा; ३९ ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अंबाजोगाई (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ‘शुभकल्याण मल्टीस्टेट’ च्या संचालक मंडळावर माजलगाव, परळी पाठोपाठ अंबाजोगाईतही गुन्हा दाखल झाला आहे. आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ‘शुभकल्याण’ने अंबाजोगाईतील ३९ ठेवीदारांच्या तीन कोटींवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. 

मुंदडांच्या उपोषणाने सत्ताधाऱ्यांची होते आहे अडचण

    अंबाजोगाई (प्रतिनिदी) - डॉ.विमलताई मुंदडा विचार मंचने जनतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून अनेकवेळा लिखीत स्वरुपात मागणी करुनही मान्य होत नसल्याने शेवटचा उपाय म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा व त्यांचे सहकारी यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास सुरुवात केली असून आज चौथा दिवस आहे, अद्याप प्रशासकीय पातळीवर कुठल्याही हालचाली दिसत नाहीत.

Pages