अंबाजोगाई तालुक्यात गारपिट; पिकांना तडाखा

अंबाजोगाई (प्रतिनिधी) दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर आज सांयकाळी अंबाजोगाईत ठिकठिकाणी गारपीट झाली. अंबाजोगाई तालुक्यासह अन्य ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे पिकांना मोठा तडाखा बसला आहे. रब्बीच्या अन्य पिकांनाही मोठा फटका बसला आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे रब्बीतील पिके धोक्यात आलेली असतानाच आज सांयकाळी अंबाजोगाईत ठिकठिकाणी गारपीट झाली. जोरदार गारांचा पाऊस झाला. यामुळे ठिकठिकाणी गारांचा थर साचल्याने चित्र पाहायला मिळाले. अंबाजोगाई सह अन्य तालुक्यातही गारपीट झाली आहे. सर्वाधिक फटका बसला असुन पिके उध्वस्त होवून लाखोंचे नुकसान झाले आहे.. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.