गेवराई

जेसीबीने वाळु उपसा; दोघांविरूध्द गुन्हा दाखल

गेवराई (प्रतिनिधी) सिंदफणा नदी पात्रातून विनापरवाना जेसीबीने वाळु उपसा करणार्‍या दोघांविरूध्द गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी उपस्याच्या साहित्यासह १ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गेवराईतील गारपिटग्रस्त भागाची कॉंग्रेस नेत्यांकडून पाहणी

गेवराई, (प्रतिनिधी):- तालुक्यात चार दिवसांपूर्वी झालेल्या गारपीट ग्रस्त भागाची कॉंग्रेस नेत्यांनी आज दुपारी भेट देवून पाहणी केली. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ,विधानसभेचे  विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील , माणिकराव ठाकरे ,खा. राजनीताई पाटील आदींनी शेतकर्‍यांशी चर्चा करून नुकसानीची माहिती घेतली. दरम्यान कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यात आले होते.

तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

गेवराई (प्रतिनिधी) नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. तालुक्यातील खांडवी येथे शेतकर्‍याने शुक्रवारी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बाळासाहेब  ढेंगळे (२७) असे शेतकर्‍याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी त्यांनी शेतामधील लिंबाच्या झाला गळफास घेऊन जिवनयात्रा संपवली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नव्हते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. 

बोण्डअळी नंतर गारपिटीने खचलेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून तात्काळ हेक्टरी 50 हजाराची नुकसान भरपाई द्या -- बदामराव पंडित

गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यातील, दुष्काळाचे चटके सहन केलेल्या शेतकऱयांना कापसावर पडलेल्या बोण्डअळी आणि आता गारपीट झाल्याने आणखीनच आर्थिक खाईत लोटले आहे. त्यामुळे सरकारने केवळ घोषणा आणि ऑनलाईनचा घोळ घालून चालणार नाही तर तात्काळ पिकांचे पंचनामे करून गारपीटग्रस्त शेतकऱयांना हेक्टरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी शेतकऱयांसह तहसिल कार्यालया समोर धरणे आंदोलन करून ठिय्या मांडला.

अनुपमा बरकसे हिचे एमबीबीएस परीक्षेत यश

गेवराई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ,नाशिकने घेतलेल्या एम बी बी एस अंतिम परीक्षेत अनुपमा राजेंद्र बरकसे हिने प्रथम क्रमांक पटकावला. 2017 डिसेंमध्ये झालेल्या मेडिकल परीक्षेत येथील प्रा राजेंद्र बरकसे यांची कन्या कु अनुपमा हिने तेरणा मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस परीक्षा दिली होती.900 पैकी 572 गुण घेउन 64 टक्के मिळवले.वैद्यकीय पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्याचा तिचा मानस आहे.तिच्या या यशाबद्दल तेरणा मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष खा पदमसिंह पाटील,आ अमरसिंह पंडित,आ सतीश चव्हाण,आ विक्रम काळे यांच्यासह संपादक,पत्रकार,मित्रपरिवार यांनी कु अनुपमा बरकसे हिचे अभिनंदन केले आहे.

पोलिस असल्याची बतावणी करत ट्रक अडविला कागदपत्र, पैशांची मागणी करत चालकासह क्लिनरला मारहाण

गेवराई (प्रतिनिधी) मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी ट्रक अडवून चालकाकडे कागदपत्रांची मागणी केली. चालकाने विरोध करताच त्याच्याकडे पैशाची मागणी करत चालकासह क्लिनरला बेदम मारहाण केल्याची घटना गेवराई शहराजवळील पेट्रोल पंपाजवळ रात्री घडली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून ट्रकला गेवराईच्या पुढे नेवून सोडले. दरम्यान या पुर्वीही असे प्रकार घडलेले असून लुटमार करणार्‍यांचा कसलाच तपास होत नसल्याने पुन्हा-पुन्हा अशा घटना घडत आहेत.

तलवड्यात पत्याच्या अड्यावर धाड ; नऊ जुगारीसह ; दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

बीड (प्रतिनीधी) अाज दुपारी तलवडा हद्दीत पोलीस अधिक्षक जी श्रीधर यांच्या पथकाने एका ठिकाणी पत्याच्या अड्यावर धाड टाकुण अाठ जुगारी पकडले. त्यांच्या कडुन दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात अाला अाहे

संकटात स्वत:ला एकटे समजू नका, आम्ही तुमच्यासोबत खा.प्रितमताईंनी दिला गारपीटग्रस्तांना दिलासा; गेवराई तालुक्यात केली पाहणी

बीड (प्रतिनिधी) रविवारी सकाळी गेवराई तालुक्यातील अनेक गावात गारपीठीचा तडाखा बसला. या गावांची पाहणी करण्यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे या सोमवारी सकाळी गेवराई तालुक्यातील खळेगांव, माटेगांव आदि गावांना भेट देण्यासाठी गेल्या असता पाहणी करून त्यांनी गावाकर्‍यांना आणि शेतकर्‍यांना दिलासा दिला. नैसर्गिक संकट सांगून येत नाही पण कितीही संकट आले तरी स्वतःला एकटे कधीच समजू नका. पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे, प्रशासन आणि आम्ही सर्वजन सदैव तुमच्या सोबत आहोत असा दिलासा त्यांनी यावेळी दिला. 

वृध्द शेतकर्‍याचा निर्घृण खून मुंडके धडावेगळे केले; पोलिसांपुढे तपासाचे आव्हान

बीड/गेवराई (प्रतिनिधी) एका वृध्द शेतकर्‍याची निर्घृणपणे हत्या झाल्याचा प्रकार पहाटे उघडकीस आला. अज्ञात मारेकर्‍यांनी वृध्दाचे मुंडके धडावेगळे करत अत्यंत क्रुरपणे खुन केल्याची घटना बेलगाव (ता.गेवराई) येथे घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून सदरिल शेतकर्‍याची हत्या कोणी व का केली? याचे कारण दुपारी उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

*राजा शिवछत्रपती महानाट्याच्या* भव्य सेट उभारणीचा आज शुभारंभ

गेवराई (प्रतिनिधी) 
स्वाभिमानी युवा ब्रिगेड आयोजित राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गेवराई येथे होणाऱ्या " राजा शिवछत्रपती " या महानाट्याच्या भव्य सेट उभारणीचा शुभारंभ गेवराई येथे होत असुन यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष श्रुषीकेश बेदरे यांनी केले आहे.

Pages