बीड शहर

पोलीस उपनिरीक्षक सय्यद सेवानिवृत्त

बीड-येथिल पोलीस दलात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक सय्यद वाजेद दि. 31 जानेवारी रोजी सेवा निवृत्त झाले. एका कार्यक्रमात त्यांचा सत्कार करून अनेकांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बीडचा रेल्वे प्रश्न थेट रेल्वे मंत्र्यांच्या दरबारी ! पालकमंत्री पंकजाताईंची पियुष गोयल यांच्याशी चर्चा

बीड ( प्रतिनिधी ) रेल्वे अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेवून नगर - बीड - परळी रेल्वे मार्ग प्रश्नी चर्चा केली. उभयतांमध्ये झालेल्या चर्चेमुळे या मार्गाला अधिक गती मिळण्याचे संकेत असून 2019 मध्ये रेल्वेची झुक .. झुक ... बीडकरांच्या कानी पडण्याची शक्यता आहे.

नांदूरफाटा येथील अपघातात एक ठार; घातपाताचा नातेवाईकांचा संशय पोलिस ठाण्यात ठिय्या; अंत्यविधी न करण्याचा आक्रमक पावित्रा

नेकनूर (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या नांदूरफाटा येथील रस्त्यावर एका तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. सदरिल प्रकार अपघाताचा असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत असले तरी नातेवाईकांनी मात्र घातपाताचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे. तक्रार देवूनही पोलिस घटनास्थळी न गेल्याने संतप्त नातेवाईकांनी नेकनूर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून आरोपीला अटक होईपर्यंत अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षीका सय्यद जरीना यांना पुरस्कार

बीड (प्रतिनिधी) तालुक्यातील चौसाळा केंद्राअंतर्गत पिंपळगाव घाट जि.प.शाळेतील शिक्षीका श्रीमती सय्यद जरीना बाबुलाल (शेख समीर) यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षीका पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविताताई गोल्हार यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

बीडच्या गांधीनगर भागात पाणीपुरवठा होईना!

बीडच्या गांधीनगर भागात पाणीपुरवठा होईना!
बीड (प्रतिनिधी) शहरातील गांधी नगर भागात मागील पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने या भागातील नागरीकांचे प्रचंड हाल होवू लागले आहेत. गांधीनगर, दिलावर नगर, अख्तर नगर या भागात पाणीपुरवठा होत नसल्याने नगर पालिकेविरूध्द प्रचंड संताप व्यक्त होवू लागला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १० फेब्रुवारीला अमृत योजनेचे उदघाटन-आ.क्षीरसागर

बीड (प्रतिनिधी) लोकहिताचे निर्णय घेवून योजना खेचून आणाव्या लागतात. पाडा-पाडीचे फोटो घेवून चमकोगिरी करून आणि नुसत्या गप्पा मारून विकास होत नसतो. नाटककं करणारी कलाकार मंडळी आता सोशल मिडीयाद्वारे पुढे येत आहे. अशा शब्दात आ.जयदत्त क्षीरसागर यांनी विरोधकांना फटकारले. साठ कोटीची नवीन सुतगिरणी तीन महिन्यात उभारत असल्याचे सांगुन शहरात पायाभुत सुविधांचे जाळे विणले जात आहे.

युतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळला ; सरकारने गांभिर्याने विचार करावा - आ. मेटे

महामंडळ, मंत्रिमंडळ विस्तार संदर्भात मुख्यमंत्र्यासोबत चर्चा ; सन्मान न झाल्यास सरकारवर परिणाम होतील

डॉ.आंबेडकर पुतळयाजवळील भिमसृष्टीचे काम 14 एप्रिल पुर्वीच - नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर

बीड (प्रतिनिधी)ः- शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात भिमसृष्टीचे काम येत्या 14 एप्रिल पुर्वी केले जाईल असे आश्‍वासन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी दिले आहे.

रेशन दुकानदार समीर केके खान यांची निर्दोष मुक्तता ; बदनामीच्या हेतूने दाखल गुन्ह्यातून निर्दोषत्व सिद्ध

बीड ( प्रतिनिधी ) बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल गुन्ह्याच्या प्रकरणात समीर खान केके खान यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. रेशन दुकानदार असलेल्या समीर केके खान यांची बदनामी करण्याच्या हेतूने दाखल गुन्ह्यातून मुक्तता झाल्याने त्यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले आहे.

शिवसेनेला आमच्या सोबत यायचे असेल तर हायकमांडला भेटावे -पृथ्वीराज चव्हाण

औरंगाबाद – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर करेल पण शिवसेनेला सोबतच ठेवील, असे मत व्यक्त केले आहे. औरंगाबाद शहरात काँग्रेसच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. सतत पाठिंबा काढण्याची धमकी शिवसेना देते, पण ही फक्त पोकळ धमकी असल्याचही ते म्हणाले.

जुना बाजार, मोमीनपुरा विकासासाठी दोन्ही क्षीरसागर कधी भांडणार? -डॉ.हाशमी इद्रीस

बीड (प्रतिनिधी)- पुर्ण बीड शहरा मध्ये सध्या विकासाचे कामे सुरु आहेत. शासकीय दवाखाने व सुभाष रोडच्या कामासाठी व उद्घाटनासाठी काका पुतने एकमेकांशी भांडणे करत आहेत. श्रेय लाटत आहेत. परंतु जुना बाजार व मोमीनपुराच्या विकासाठी दोन्हीही क्षीरसागर कधी भांडरे करणार याची वाट या भागातील जनता पहात आहे. गेल्या तीन चार वर्षा पासुन जुना बाजार या मास्टर प्लॅन काम रेंगाळलेले आहे. आता मोमीनपुरा येथील रस्त्याचे काम तसेच जुनाबाजार सारखेच झालेले आहे. रस्त्यावर घान पाणी साचलेले आहे. खड्डयामध्ये साचलेल्या घान पाण्यामुळे या भागातील जनतेचे स्वास्थ्याला धोका निर्माण झालेला आहे.

धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही-इंजि.देवकते

बीड, (प्रतिनिधी):- आघाडी सरकार सत्तेवर असतांना धनगर समाजाला आरक्षण देवू असे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर भाजप-सेना सरकारनेही निवडणुकीच्या दरम्यान धनगर समाजाला आरक्षण देवू असे आश्‍वासन दिले होते. मात्र अद्यापपर्यंत आश्‍वासन पुर्ण झाले नाही. धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपण गप्प बसणार नसल्याची ग्वाही देत आरक्षणासंदर्भात आरखीन तिव्र आंदोलन उभे करणार असा ईशारा युवा मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष इंजि.विष्णु देवकते यांनी दिला आहे.

जिल्हाकचेरीसमोर हमाल मापाडींचे आंदोलन

बीड, (प्रतिनिधी):- राज्य शासनाच्या कामगार विभागाने १७ जानेवारी २०१८ रोजी शासन निर्णयान्वये राज्यातील ३६ माथाडी मंडळाचे विलीनीकरण करुन राज्याचे एकच माथाडी मंडळ स्थापित करण्यासाठी कमिटी स्थापन केली आहे. या निर्णयाला महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाने विरोध केला असुन आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णय मागे घ्या या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजीने जिल्हाकचेरी परिसर दणाणून गेला होता.

विद्यार्थ्यावर कुत्र्यांचा हल्ला

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील इस्लामपुरा भागात शाळेत जात असलेल्या एका विद्यार्थ्यावर चार ते पाच कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना आज सकाळी घडली. सदर विद्यार्थी हल्ल्यात जखमी झाला आहे. दरम्यान इस्लामपुरा, अजिजपुरा, धांडे गल्लीसह अनेक भागांमधील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

अंजनडोह येथील विवाहिता रेशमा निर्मळ मागील दीड वर्षापासून गायब घातपात झाला असल्याचा संशय

बीड प्रतिनिधी-धारुर तालुक्यातील अंजनडोह येथील विवाहिता रेशमा निर्मळ मागील दीड वर्षापासून गायब घातपात झाला असल्याचा संशय या बाबत सविस्तर व्रत असे की रामदास सोपान निर्मळ रा.अंजनडोह ता.धारुर जि.बीड यांची मुलगी रेशमा निर्मळ हिचा विवाह आनंदगाव(सा) ता.केज येथील बापू सौदागर यांचा मुलगा अमोल सौदागर याच्या बरोबर ३१ मार्च २०१६ रोजी हिंदु रितीरिवाजा नुसार अंजनडोह येथे झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी ति  तिच्या चुलत बहिणीच्या लग्नाला दिरा सोबत माहेरी आली त्यावेळी तिने  मला सासरचे सर्व लोक मानसिक त्रास देतात. नवरा म्हणतो की तु मला पसंत नाहीस .तु जाडी आहेस  मला  तुझ्याशी बळच लग्न करून दिले.

बीड- हुतात्मा दिनानिमित्त उद्या मंगळवारी दोन मिनिटे मौन पाळण्याचे निर्देश

बीड ( प्रतिनिधी ) देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी उद्या मंगळवारी ( दि. 30 ) दोन मिनिटे मौन ( स्तब्धता ) पाळण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

एका लॉन्सवर पोलिसांचा छापा ; जुगार खेळणाऱ्या 12 जणांना पकडले

बीड (प्रतिनीधी)
शहरातील बार्शी रोडवरील एका लॉन्स मध्ये रिसेप्शनच्या कार्यक्रमापूर्वी झन्नमन्ना जुगार खेळणाऱ्या 12 जणांना पोलिसांनी पकडले सोमवारी ( दि.29 ) सांयकाळी ५ च्या सुमारास एसपी पथकाने धाड टाकली 12 जन ताब्यात घेतले व जुगाराचे साहित्य मुद्देमाल जप्त केला अाहे.

राज्यात अध्यात्मिक श्रीमंतीचा जिल्हा म्हणून बीडची ओळख - आ.जयदत्त क्षीरसागर

बीड दि.(प्रतिनिधी)ः- वारकरी सांप्रदाय नामस्मरणाच्या माध्यमातून देवाचे महत्व आणि महात्म्य टिकवून ठेवत आहे. बीड जिल्हा हा वारकरी सांप्रदायामुळे राज्यात अध्यात्मिक श्रीमंतीचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला असल्याचे प्रतिपादन लोकनेते आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

Pages