बीड शहर

दिंद्रुड येथे सोळा लाखाचा गुटखा पकडला डिवायएसपी भाग्यश्री नवटक्केंची सिंघम कारवाई

बीड (प्रतिनिधी) जिल्हाभरात अवैध धंद्यांविरोधात जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी व्यापक मोहिम राबवली आहे. यामुळे अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. आज सकाळी तीन वाजता बेंगलोरहून गुटखा घेवून बीडकडे निघालेल्या ट्रकला दिंद्रुड येथे डिवायएसपी भाग्यश्री नवटक्के यांच्या टीमने ताब्यात घेत सोळा लाख पन्नास हजार रूपयाचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणाने अवैध गुटखा विक्री करणार्‍या खळबळ माजली आहे.

बीड जिल्हयात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान - पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी घेतली तातडीने दखल ; पंचनामे करण्याचे जिल्हाधिका-यांना दिले आदेश

बीड ------
बीड तालुक्यासह माजलगांव आणि गेवराई तालुक्याला आज सकाळी गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी या घटनेची तातडीने दखल घेत जिल्हाधिका-यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. नुकसानग्रस्त गावांना लवकरच भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यात गारपिट ; पिकांना तडाखा

बीड ( प्रतिनिधी ) दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर आज पहाटे जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपीट झाली. बीड , माजलगाव तालुक्यासह अन्य ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे पिकांना मोठा तडाखा बसला आहे. 

वरिष्ठ क्रिकेट संघाची मंगळवारी निवड चाचणी

बीड / वार्ताहर
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ खेळाडूंची क्रिकेट स्पर्धेसाठी १३ फेब्रुवारी मंगळवारी निवड केली जाणार आहे. ही निवड प्रक्रिया बीड जिल्हा क्रिकेट संघाची असणार आहे, अशी माहिती बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर व सचिव आमेर सलीम यांनी दिली.

बीडच्या विद्यार्थ्याने केली स्वत्हा केरळमधुन अपहरणकर्त्यांच्या तावडीतुन सुटका

बीड|प्रतिनिधी

जामखेड येथील आठवडी बाजारातुन भरदिवसा गुंगीचे औषध तोंडाला लावून १४ वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी या मुलास केरळ या ठिकाणी घेऊन गेले होते. मात्र, मोठ्या धाडसाने या मुलाने गाडीच्या काचा फोडून स्वत:ची सुटका करवून घेण्यात यश मिळवले.

परिक्षेदरम्यान गैरप्रकार करता यावेत याच उद्देशाने सिसीटीव्ही कॅमेर्‍याची तोडफोड

बीड (प्रतिनिधी) शहरातील मिल्लीया उच्च माध्यमिक विद्यालयात वर्गात आणि व्हरांड्यात बसवलेले सिसीटीव्ही कॅमेरे अज्ञातांनी फोडल्याचा प्रकार काल सायंकाळी घडला. याप्रकरणी विद्यालय प्रशासनाने बीड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून सिसीटीव्ही फोडणारा एक जण अन्य एका फुटेजमध्ये दिसून आल्याने पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान दि.२१ फेब्रुवारी पासून बारावीच्या परिक्षा सुरू होत आहेत.

आरटीई प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू ऑनलाईन अर्ज भरण्याची २८ फेब्रुवारी अंतीम मुदत

बीड (प्रतिनिधी) शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पुढील शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी आजपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरण्याची अंतीम मुदत २८ फेब्रुवारी आहे. 

पोलिसांचे सात ठिकाणी छापे; तीन हजार लिटर गावठी दारू जप्त

बीड (प्रतिनिधी) पोलिसांनी हातभट्टी दारू विक्रेत्यांविरूध्द कारवाईचा बडगा उगारला आहे. एकाच दिवसात जिल्ह्यात विविध सात ठिकाणी छापे टाकून तब्बल ३ हजार १६९ लिटर दारूसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लिंबागणेशच्या भालचंद्र देवस्थान परिसर विकासासाठी दिड कोटी पालकमंत्री पंकजाताईंच्या माध्यमातून बालाघाटावरील तिर्थक्षेत्राचा विकास

लिंबागणेश (प्रतिनिधी) बीड जिल्हयातील तिर्थक्षेञ विकासासाठी भुतो न भविष्यती करोडो रुपये निधी पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून मंजूर केला जात आहे. बालाघाटावरिल लिंबागणेश येथील जागृत देवस्थान भालचंद्र गणपती मंदीर परिसराचा विकास व्हावा हि भावीक-भक्तांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासुन होती, त्याची दखल घेवून ना.पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून दीड कोटी रुपये निधी विकास कामाकरिता मंजूर झाले असल्याचे माहिती भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी दिली आहे.

घरासमोर उभी केलेली कार दिली पेटवून

बीड (प्रतिनिधी) शहरातील पेठ बीड भागातील आकाशवाणी केंद्राच्या बाजुच्या परवाना नगर भागात घरा समोर उभी केलेली कार अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याचा प्रकार शनिवारी पहाटे घडला आहे. परवाना नगर भागातील रहिवाशी गायकवाड यांच्या मालकीची (एमएच ३१- ३२५५) कार घरासमोर लावली होती. सूत्रांनी सांगितल्या नुसार पहाटे चार वाजता कारच्या बाजूने धूर निघू लागला. थोड्याच वेळात धूराचे रूपांतर मोठ्या आगीत झाले व गायकवाड यांची कार जळून खाक झाली.

बीडच्या जागेवर कॉंग्रेसचा दावा !

राष्ट्रवादीची अडचण; पापा मोदींकडुन घडी बसविण्याचा प्रयत्न; अनेकांच्या पक्षप्रवेशाचे संकेत

धानोरा रोड वरील खड्डे बुजवा

नगरसेवक भैय्या मोरे, रंजित बनसोडे यांची मागणी

राज्यातील ग्रामीण भागात शिक्षण व रोजगार हि अत्यंत गंभीर समस्या

बीड (प्रतिनिधी) डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) व स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्यावतीने राज्यव्यापी ’युवा-विद्यार्थी जागर जत्था’चे आयोजन करण्यात आलेले आहे. गेल्या ४ फेब्रुवारीपासून हे जत्थे राज्यभर युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करत आहे. नांदेड येथून सुरु झालेला मराठवाडा जत्था हा नांदेड, हिंगोली, परभणी, जालना व औरंगाबाद या जिल्ह्यात फिरून गेल्या तीन दिवसापासून बीड जिल्ह्यात फिरत आहे. आज सकाळी या जत्थ्याचे आगमन शहरात झाले.

मुख्यमंञी फडणवीस यांच्या उपस्थितीत नारायणगडाच्या विकास कामाच्या भूमिपूजनाची जय्यत तयारी - अा.मेटे

जिल्हाअधिकारी एम.डी सिंह कडुन अाढावा

बीड: तालुक्यातील श्री. क्षेत्र नारायणगड येथे २५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमास ५० हजारांपेक्षा अधिक भाविक भाविक येणार आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गुरुवारी आ. विनायक मेटे, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाºयांनी गडाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी सुरक्षेच्या अनुषंगाने यंत्रणेला योग्य त्या सूचना दिल्या.

प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण हटविले; प्रशासनाने सांमजस्य घडवल्याने रस्ते रहदारीस मोकळे

बीड (प्रतिनिधी) शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे अतिक्रमणे करण्यात आली होती. रस्त्याच्या कडेस असलेल्या दुकानांमुळे रहदारीस अडथळा येत होता. अख्खे रस्तेच्या रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले होते. त्यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत होता. यासंदर्भात नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी अतिक्रमण हटवण्यास सुरूवात केली. काही व्यक्तींनी त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला. पालिकेच्या अधिकार्‍यांना आणि कर्मचार्‍यांनाही रोखले.

हजरत मन्सुर शाह वली (रहे) उर्दु माध्यमिक शाळेत बक्षीस वितरण,पुरस्कार व सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न

बीड (प्रतिनिधी):- हजरत मन्सुर शाह वली (रह) उर्दु मा. शाळेत विद्यंार्थ्यांस तसेच शैक्षणीक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या मान्यवरास सलाम एज्युकेशनल ऍण्ड ऑदर वेलफेअर सोसायटी, बीड साप्ताहीक अजान ए.अदम, हुदा एज्युकेशन सोसायटी व हमदर्द पब्लीक लायब्ररी तर्फे बक्षीस व पुरस्कार वितरण समारंभ राम-कृष्ण लॉन्स, अंबीका चौक शाहु नगर बीड येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माार्गदर्शक मोहम्मद इब्राहीम अन्वरी हे उपस्थित होते.

Pages