महिलेचे मंगळसूत्र जबरीने चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले ; युसूफ वडगाव पोलिसांची कामगिरी

बीड (प्रतिनिधी)दि. 08/02/2024 रोजी 11.00 वा. चे सुमारास महिला नामे विजयमाला अंगद गुंडरे, वय - 60 वर्षे, रा. गुंडरे वस्ती, डिगोळ आंबा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या शेताकडून गावाकडे केज - अंबाजोगाई रोडने पायी चालत जात असताना यातील तीन आरोपींनी मोटरसायकल वरून समोरून येऊन मोटरसायकल फिरवून घेऊन फिर्यादीच्या गळ्यातील तीन ग्रॅम मोजण्याचे 15,000/- रू. किंमतीचे मनी मंगळसूत्र जबरीने हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता सदर महिलेने आरडा ओरड केल्याने तेथील स्थानिक नागरिकांनी त्यातील एका आरोपीस पकडले. सदरबाबत नागरिकांकडून युसूफ वडगाव पोलीस ठाण्यास माहिती प्राप्त झाली असता युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि मच्छिंद्रनाथ शेंडगे व पथक तात्काळ घटनास्थळी आले असता ताब्यात घेतलेला आरोपी नामे रितेश वसंत चव्हाण, वय - 19, साईनाथ सिटीजवळ, अंबाजोगाई याचेकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचे कडून इतर दोन साक्षीदाराबाबत माहिती घेऊन एकाचा मोबाईल नंबर हस्तगत करून तांत्रिक माहिती च्या आरोपी नामे गणेश बालासाहेब भापकर, वय 21 वर्षे, रा. गारवा हाटेलच्या मागे, लातूर रोड, अंबाजोगाई यास तिथूनच थोड्या अंतरावरील ज्वारीच्या शेतातून पोलीस पथकाने ताब्यात घेतले. सदर महिलेच्या फिर्यादीवरून युसुफ वडगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. 31/2024 प्रमाणे कलम 392, 34 भादंवीप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना अटक केली असून उर्वरित एका आरोपीच्या व चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत सपोनि शेंडगे पुढील तपास करत आहेत.

     आरोपीतांकडुन इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

 सदरची कामगिरी नंदकुमार ठाकुर, पोलीस अधीक्षक. चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई, कमलेश मीना, सहा. पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांचे मार्गदर्शनाखाली मच्छिंद्रनाथ शेंडगे, सहा. पोलीस निरीक्षक, पोहवा/455 खेडकर, पोशि/2152 समुद्रे, पोशि/1921 म्हेत्रे, वाघ, पोशि/1879 केदार, चालक पोशि/2297 आतार सर्व नेमणूक - युसूफ वडगाव पोलीस ठाणे यांनी केली आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.