अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना केला अत्याचार.;आरोपीवर पोलिसात पोस्को गुन्हा दाखल.

माजलगाव प्रतिनिधी दि.4

 

अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना एका व्यक्तीने घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना 15 जुलै ते 30 जुलैच्या काळात घडली.दरम्यान पीडित मुलीच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी व्यक्तीवर 3 डिसेंबर रोजी पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सूत्राकडून समजलेली माहिती अशी की 15 जुलै 2022 एक अल्पवयीन मुलगी घरात एकटीच होती.घरात कोणी नसल्याचा फायदा एका व्यक्तीने उचलेत घरात प्रवेश केला.व अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.त्यानंतर ही आरोपीने पीडित मुलीच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अत्याचार केला.असा प्रकार त्याने सतत 15 जुलै ते 30 जुलैच्या काळात अनेक वेळा केला. दरम्यान पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी व्यक्तीवर ग्रामीण पोलीस ठाण्यात 3 डिसेंबर रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 349/2022 कलम 376(2)(एन) 4,6,भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे या करत आहेत.दरम्यान आरोपी फरार असल्याची माहिती आहे.पोलिसांकडून शोध घेतल्या जात आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.