गुजरातच्या काळ्या बाजारात जाणारा तांदूळ पोलिसांनी पकडला.

गुजरातच्या काळ्या बाजारात जाणारा तांदूळ पोलिसांनी पकडला.

आयपीएस बी.धीरजकुमार यांच्या कार्यवाहीत 45 लाख 34 हजाराचा  मुद्देमाल जप्त.

तालखेड फाट्याजवळ केली कार्यवाही.

माजलगाव ( प्रतिनिधी ) गुजरातच्या काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा शासकीय तांदूळ पोलिसांनी पकडला.ही कार्यवाही आयपीएस बी.  धीरजकुमार यांनी तालखेड फाटा येथे सोमवार दि.7 रोजी दुपारच्या दरम्यान केली आहे.यावेळी पोलिसांनी 38 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लेलँड कंपनीच्या 14 टायर ट्रक क्रमांक एम.एच.21,बीजी 2218 या ट्रक मधून राशनचा तांदूळ तालखेड फाट्यावरून जात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली.यावरून  आयपीएस बी.धीरजकुमार यांनी वरील क्रमांकाचा ट्रक तालखेड फाट्याजवळ अडवला.यावेळी पोलिसांनी ट्रकमध्ये असणाऱ्या तांदळाच्या बोऱ्या तपासल्या.यात राशनचा तांदूळ दिसून आला. तांदूळ बोऱ्यांची मोजणी केली असता 29380 किलो तांदूळ भरला.25 रुपये प्रतिकिलो प्रमाणे ज्याची किंमत 7 लाख 34 हजार पाचशे रुपये होते.तर पकडलेल्या जुन्या लीलँड कंपनीच्या ट्रकची किंमत 38 लाख रुपये आहे. दरम्यान सदरील ट्रक हैदराबाद वरून भरून गुजरातच्या काळ्या बाजारात जात असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.पो.ना. अतिशकुमार देशमुख यांच्या फिर्यादीवरून आरोपी जयश मुकुंद पगारे,विकास संजय हिवराळे (राहणार इब्राहिमपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना) यांच्याविरोध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.