लंपी या आजारापासून जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी गॉट फॉक्स लसीचा बूस्टर डोस म्हणून उपयोग करावा

आष्टी (प्रतिनिधी) -
महाराष्ट्रातील आठ जिल्हे व सव्वीस तालुके लंपी आजाराने संक्रमित झाले आहेत.  बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील एका गावात या आजाराने ग्रस्त असलेल्या गाई आढळल्या आहेत. यामुळे मतदार संघातील सर्व शेतकऱ्यांननी लंपी या आजारापासून जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी गॉट फॉक्स या लसीचा बूस्टर डोस म्हणून उपयोग करावा असे आव्हान आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.
             आ. धस यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, लंपि या आजारामुळे जनावर दगावण्याचे प्रमाण जास्त असल्याने बीडचे जिल्हाधिकारी यांनी काही ठिकानचे जनावरांचे आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सध्या दुधाला जास्त दर असल्याने काही शेतकरी इतरत्र गोठ्यावर जाऊन गाई खरेदी करत असल्याचे कानावर येत असून शेतकऱ्यांनी असे करू नये व आजार संपे पर्यंत नवीन गाई खरेदी देखील करू नये असे आव्हान आ. धस यांनी बोलताना केले. बाहेरून खरेदी करून आणलेल्या गाईंमुळे चांगल्या जनावरांना देखील त्यांचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डास, माशी व लाळीच्या माध्यमातून या रोगाचा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच योग्य ती खबरदारी घ्यावी. जिल्हा प्रशासन याबाबतीत लागणाऱ्या लसींचा साठा करत असून लसीचा साठा वाढवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आ. धस यांनी सांगितले. तोपर्यंत शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध असलेली गॉट फास्ट नावाची लस (बूस्टर डोस) जनावरांना तात्काळ द्यावी जेणेकरून जनावरे सुरक्षित राहण्यास मदत होईल.
               तालुक्यात सर्वाधिक असे सव्वा लाख दुभती पशुधन आहेत. आपल्या शेजारील नगर जिल्ह्यातील पाथर्डी व नेवासा तालुक्यात लंपी रोगाचा संसर्ग जास्त प्रमाणात असल्याने या दोन तालुक्यापासून जवळ असलेल्या गावांनी सतर्क राहून जनावरांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. संसर्ग झालेल्या गावच्या पाच किलोमीटर परिसरातील जनावरांना लसी देण्याचा शासन नियम आहे. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मतदार संघात सरसकट लसीकरणाची मागणी शासन दरबारी करणार असल्याचे आमदार धस यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.