डॉ.जाजू दाम्पत्याचा पापाचा घडा अखेर भरलाच!

डॉ.जाजू दाम्पत्याचा पापाचा घडा अखेर भरलाच!

जाजू हॉस्पिटल मधील प्रसूती दरम्यान महिला,बाळ मृत्यू प्रकरण आले अंगलट.

उपचार करण्याची पद्धती माहीत नसताना उपचार केल्याचा ठपका ठेवत शहर पोलिसात गुन्हा दाखल.

माजलगाव प्रतिनिधी दि.16

शहरातील जाजू हॉस्पिटल येथे रविवारी पहाटे प्रसुती दरम्यान एका महिलेचा बाळासह मृत्यू झाल्याची घटना घडली.ही घटना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचा आरोप करत नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.यावेळी शवविच्छेदनासाठी दोन्ही मयतास अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. दरम्यान प्राप्त अहवालानुसार रात्री दहा वाजता डॉक्टर जाजू दाम्पत्यावर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेने जाजू दांपत्याचा पापाचा घडा भरला असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य जनतेमधून अरुण उमठत आहेत.

सोनाली पवन गायकवाड वय 22 ही महिला रविवारी जाजू हॉस्पिटल हॉस्पिटल मध्ये प्रसूती घेण्यासाठी दाखल झाली होती.दरम्यान बाळंत मुलीची संपूर्ण ट्रीटमेंट याच हॉस्पिटल येथे सुरू होती.सोमवारी पहाटे तिला प्रसूती वेदना जास्त होत असल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांना लक्ष देण्याची विनंती केली.परंतु डॉक्टरांनी लक्ष दिले नाही.त्यामुळे प्रसूती दरम्यानच रक्त थांबत नसल्याने बाळाचा मृत्यू झाला.तर बाळंत महिलेची प्रकृती बिघडली.यावेळी डॉक्टरांनी तिला दुसऱ्या हॉस्पिटल कडे हलविण्यास सांगितले.दरम्यान महिलेचा सात वाजून 45  मिनिटांनी मृत्यू झाला.बाळा सह महिलेच्या दोन्ही मृत्यूस डॉक्टर विजयकुमार जाजू व डॉक्टर उर्मिला जाजू हे डॉक्टर दाम्पत्य जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी करत दोन्ही मृतदेह जाजू हॉस्पिटलमध्ये आणून ठेवले.या दोन डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह हलवणार नसल्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. नातेवाईकांचा मोठा जमाव हॉस्पिटल समोर जमा झाला होता. यावेळी पोलिसांनी नातेवाईकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. नातेवाइकांनी पोलिस स्टेशन समोरही गुन्हा दाखल करण्यासाठी गर्दी केली होती.दरम्यान पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी  दोन्ही मृतदेह तपासणीवर शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठवले.दरम्यान रविवारी रात्री दहा वाजता मयत महिलेचे वडील मुकुंद मुंजाबा काळे यांच्या फिर्यादीवरून डॉक्टर दांपत्य उर्मिला विजयकुमार जाजू व विजयकुमार जाजू यांच्यावर गु.र.118/2022 कलम 304,34 नुसार दाखल करण्यात आला.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.