धुळे - सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको

**

 

मांजरसुंबा - सय्यद अर्शद

बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे धुळे-सोलापुर महामार्गावर आज शेतकऱ्यांचे सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत वाटप करावी या मुख्य मागण्यांसह इतर मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन झाले. या आंदोलनासाठी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल गलधर, आप चे अशोक येडे, बाळासाहेब मोरे, अशोक रसाळ, बळवंत कदम यांच्या सह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेकडो शेतकरी सहभागी होते. हे चक्काजाम आंदोलन तब्बल दोन तास सुरू होते. यामुळे अनेक किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.

हे आंदोलन मागे घेतल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असताना अधिकाऱ्यांकडून अपेक्षित तसा प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी अचानक आक्रमक झाले. आणि अधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घालत गाडीसमोरच झोपले यानंतर पोलिसांच्या मदतीने अधिकाऱ्यांनी तेथून पळ काढल्याचे पहायला मिळाले.

यानंतर मात्र आता जिल्हाधिकारी कार्यालय आणि महावितरण च्या कार्यालयात जागरण गोंधळ आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे रमेश पोकळे यांनी दिला आहे.

संपूर्ण आंदोलनादरम्यान महावितरणच्या गलथान कारभारामुळे त्रस्त झालेले शेतकरी अतिशय आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले. जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पावित्रा सुरुवातीला शेतकऱ्यांनी घेतला होता. मात्र काही प्रमुखांच्या हस्तक्षेपानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर ही शेतकऱ्यांच्या आणि आंदोलनकर्त्यांच्या हाती पुन्हा एकदा केवळ निराशाच पडली आहे. यामुळे आता पुढे नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.