बीड जिल्ह्यात आजपासून 12 मे पर्यंत पुन्हा कडक लॉकडाऊन

बीड जिल्ह्यात आजपासून 12 मे पर्यंत पुन्हा कडक लॉकडाऊन 
बीड दि.7 ( प्रतिनिधी ) जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज शुक्रवारी दुपारी लॉकडाउन डाऊन संदर्भात नवीन आदेश काढले आहेत. आज मध्यरात्रीपासून दिनांक 12 मे पर्यंत पूर्णवेळ लॉकडाउन लावण्यात आले आहे. शनिवार, रविवार , सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवशी वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व स्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. फळ विक्रेत्यांना या कालावधीत दररोज सकाळी  7 ते 10 यावेळेत फिरून भाजीपाला, फळ ,दूध विक्री करता येणार आहे. संध्याकाळी पाच ते सात या वेळेत फिरून फळ विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांनी आजच्या आदेशात म्हटले आहे की,  शनिवार , रविवार , सोमवार , मंगळवार व बुधवार ( दिनांक ०८/०५/२०२१ , ० ९ / ०५ / २०२११० / ०५ / २०२१ , ११/०५/२०२१ व १२/०५/२०२१ ) या दिवशी केवळ सर्व औषधालये ( Medical ) , दवाखाने , निदान क्लिनीक , लसीकरण केंद्रे , वैद्यकिय विमा कार्यालये , फार्मास्युटिकल्स , फार्मास्युटिकल कंपन्या , इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स , वाहतुक आणि पुरवठा साखळी , लसींचे उत्पादन व वितरण , सॅनिटायझर्स , मास्क , वैद्यकिय उपकरणे , कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा , पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने , टपाल सेवा इ . उपरोक्त सेवा सुरू राहील. या अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आस्थापना वगळता इतर कोणत्याही आस्थापना उपरोक्त दिवशी चालू राहणार नाहीत . 
2) शनिवार , रविवार , सोमवार , मंगळवार व बुधवार ( दिनांक ०८/०५/२०२१ , ० ९ / ०५ / २०२१ १०/०५/२०२१ , ११/०५/२०२१ व १२/०५/२०२१ ) जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणान्या आस्थापना किराणा दुकाने , चिकन , मटन विक्रीचे दुकाने , बेकरी व कृषीशी संबंधित इ . पूर्णतः बंद राहतील .
3)  गॅस वितरण दिवसभर सुरु राहील . 
4 ) तसेच प्रत्येक दिवशी ( दिनांक ०८/०५/२०२१ ते १२/०५/२०२१ ) पर्यंत केवळ पायदळ / गाडीवर  हातगाड्यावर फिरुन दुध , भाजी व फळांची विक्री केवळ सकाळी ७.०० ते १०.०० वाजेपर्यंत व फक्त फळांची विक्री सायकांळी ०५.०० ते रात्री ०७.०० या वेळेत करता येईल.
5)  बँकेचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १०.०० ते दु .१२.०० वाजेपर्यंत अंतर्गत कामकाजासाठी व शासकीय व्यवहारासाठी सुरु राहील . पेट्रोलपंप व गॅस एजंसी यांना कंपनीस देयके द्यावी लागतात तसेच पेट्रोलपंपावर रोख रक्कम मोठ्या प्रमाणात जमा होते . करिता पेट्रोल पंप व गॅस एजंसी यांना सदर वेळेत बँकेत जाऊन कामकाज करता येईल . 1 ६. सर्व अधिकारी / कर्मचारी जे कोरोना विषयक कामकाज करत आहेत ( उदा . डॉक्टर्स , नर्सेस , आरा . विभागाचे , महसूल विभागाचे , पोलीस विभागाचे , जिल्हा परिषदेचे इ.अधिकारी / कर्मचारी ) ज्यांचेकडे संबंधीत कार्यालय प्रमुखाने दिलेले ओळखपत्र असेल त्यांनाच कार्यालयात ये - जा करण्याची मुभा असेल . ७. दिनांक ०८/०५/२०२१ ते १२/०५/२०२१ या कालावधीत निर्बध असलेल्या आस्थापना चालू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सिल करण्यात येतील . FAIRMIRY सदरच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील . उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता १८६० ( ४५ ) च्या कलम १८८ , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल , सदर आदेशाचा अंमल दिनांक ०७/०५/२०२१ रोजीच्या रात्रीच्या १२.०० पासुन राहील

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.