कत्तलखान्याकडे जनावरांना घेऊन जाणारा आयशर पकडला.

पोलिसांनी सावरगावनजीक केली कार्यवाही.

 

माजलगाव (प्रतिनिधी0 दि.12

 

शेती उपयोगी जनावरांना कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा आयशर पोलिसांनी पकडला.ही कार्यवाही तालुक्यातील सावरगाव येथील महामार्गावर रविवार दि.11 रोजी पहाटे दीड वाजण्याच्या दरम्यान केली.

 

रविवारी पहाटे दीडच्या दरम्यान पेट्रोलिंग करणाऱ्या ग्रामीण पोलिसांनी सावरगाव येथील महामार्गावर आयशर टेम्पो (क्र.एम. एच.46 E-7866) अडवला. अंदाजित किंमत 5 लाख रुपये यावेळी पोलिसांनी सदरील टेम्पोची झडती घेतली असता,यात अवैधरित्या शेती उपयोगी असणाऱ्या 5 बैलजोड्या व सहा वासरे आढळून आली.ज्याची अंदाजित किंमत 3 लाख 50 हजार रुपये.असा एकूण साडे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.दरम्यान पोलिसांनी टेम्पो चालक मालक शेख समीर शेख शब्बीर यास ताब्यात घेतले.यावेळी आरोपीने सदरील आयशर टेम्पो सिल्लोड वरून लातूरकडे कत्तलखान्याकडे घेऊन जात असल्याचे कबूल केले.अध्याप दुपारपर्यंत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.