बीड जिल्ह्यात आजपासून संध्याकाळी 7 नंतर सर्व दुकाने बंद - जिल्हाधिकारी

बीड जिल्ह्यात आजपासुन संध्याकाळी 7 नंतर सर्व दुकाने बंद - जिल्हाधिकारी
बीड (प्रतिनिधी):- जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज दि.13 मार्च रोजी नविन आदेश जारी केले आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व हॉटेल, खानावळ, चहाचे हॉटेल,बार, रेस्टॉरंट, पानटपरी इ. ग्राहकांसाठी आजपासुन पुर्णत: बंद राहतील. केवळ पार्सल सुविधा सुरू राहतील. असे आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हॉल व इतर कार्यक्रम दि.18 मार्च 2021 पासुन पुढे अनिश्चीत काळासाठी बंद राहतील. जिल्ह्यातील फळविक्रेते व भाजीपाला विक्रेते यांनी मास्कचा वापर करून फळ व भाजीपाला विक्री करावा. जिल्ह्यातील सर्व दुकाने/आस्थापना (सर्व अत्यावश्यक किराणा, दुध विक्रेते आणि औषधालय/मेडिकल वगळून) दररोज सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज दिले आहेत. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.