टेम्पो मोटर सायकलची धडक;एक ठार एक जखमी.;दिंद्रुड तेलगाव रस्त्यावरील दुर्घटना.

राज गायकवाड-माजलगाव.

 भरधाव वेगातील टेम्पोने मोटार सायकला दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना तेलगाव दिंद्रुड महामार्गावर रविवार दि. 27 डिसेंबर रोजी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील रहिवासी सुंदर हरीभाऊ राऊत वय (52 वर्ष )व धोंडीबा गुणाजी सोनवणे (वय 65 वर्षे) हे दोन इसम परळी येथील नातेवाईकाच्या लग्नाला सकाळी गेले होते.दरम्यान लग्न लावून पाच वाजण्याच्या सुमारास ते गावाकडे परत येत असताना दिंद्रुड तेलगाव रस्त्यावर त्यांच्या मोटर सायकलला (बी. एन.09,CU-9920)समोरून येणाऱ्या टेम्पो जोराची धडक दिली. या अपघातात मोटर चालणारे हरिभाऊ राऊत जागीच ठार झाले. तर धोंडीबा गुणाजी सोनवणे हे गंभीर जखमी झाले आहेत.दरम्यान घटनास्थळी दिंद्रुड पोलिसांनी धाव घेतली असून जखमींना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक गणेश राठोड हे करत आहेत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.