ऊस वाहतूक बैलगाडीला धडकून मोटारसायकल युवक ठार.

 

दुगड पेट्रोल पंपासमोरील घटना.

माजलगाव प्रतिनिधी दि.25

साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जात असलेल्या ऊस वाहतूक बैलगाडीला मोटरसायकल स्वराने धडक दिली.या अपघातात चालक युवक जागीच ठार झाला असून शुक्रवार दिनांक 25 रोजी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 61 वर दुगड पेट्रोल पंपासमोर घडली.

अमोल काबुराव हंडे वय 27 हा युवक मोटरसायकलवरून आपल्या गावी (शुक्ल तीर्थ लिमगाव येथे) मोटारसायकल वरून जात होता. यावेळी गाडीवरील कंट्रोल न राहिल्याने त्यांच्या गाडीची धडक ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला बसली. झालेल्या जोरदार धडकेमुळे अमोल हांडे हे जागीच ठार झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 61 वर शहरापासून जवळच असलेल्या दुगड पेट्रोल पंपासमोर रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मयत शरीराला शवविच्छेदनासाठी  ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.