बीडमधील आजचा ' तो ' पॉझिटिव्ह जुनाबाजारचा

बीडमधील ' तो ' पॉझिटिव्ह जुनाबाजारचा 

बीड दि.3 ( सिटीझन ) जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून आज शुक्रवारी 188  व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. प्रशासनाला अहवाल प्राप्त झाले असून 188 पैकी 2 रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 173 निगेटिव्ह आणि 13 अनिर्णित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आजचे दोन पैकी 1 बीड शहरातील जुना बाजार येथील 17 वर्षीय असून तो बाधीत रुग्णाच्या संपर्कातील आहे. तर अन्य एक गिरवली ( ता.भूम ) येथील आहे.
दरम्यान आज प्रशासनाने जी माहिती दिली आहे त्यातही पॉझिटिव्ह रुग्णाचा पत्ता चुकीचा असून तो जुना बाजार येथील असून प्रशासनाने अजीजपुरा येथील पत्ता दिल्याने पुन्हा गोंधळ उडाला.  

*कोविड 19-बीड अपडेट - 03/जुलै/२०२०*
*आज पाठविलेले स्वॅब - 188*
*निगेटिव्ह अहवाल - 173*
*पॉजिटिव्ह अहवाल - 02
 * इंनकनकलुसिव्ह- 13
1) वय 17 पु, रा. जुनाबाजार बीड
2) वय 25 स्त्री, रा गिरवली ता भूम जिल्हा उस्मानाबाद8

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.