बीड शहर 9 जुलैपर्यंत लॉकडाऊन

बीड शहर 9 जुलै पर्यंत लॉकडाऊन 

बीड दि.1 ( सिटीझन ) शहरात आज तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आजपासून दि.9 जुलै पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत. आजपासून बीड शहरातील नागरिकांना इतर जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्याची ऑनलाइन व ऑफलाईन  परवानगी मिळणार नाही असे आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. बीड शहरात विशेष परवानगी शिवाय कोणालाही या कालावधीत प्रवेश करता येणार नाही व शहराबाहेरही जाता येणार नाही. मात्र मेडिकल इमर्जन्सी मधील  पाससाठी  नेहमीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून पास उपलब्ध करून घेता येईल.

◆ वैद्यकीय सेवा, वर्तमानपत्रे माध्यमा विषयक सेवा चोवीस तास सुरू राहतील.

◆ अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालय वगळता शहरातील सर्व आस्थापना, बँका (शासकीय व खासगी )अस्थापना बंद राहतील.

◆  महसूल, पोलीस, ग्रामविकास ,नगर विकास कृषी व आरोग्य या सहा विभागांचे कर्मचारी ओळख पत्राद्वारे शहरांतर्गत प्रवास करू शकतील.

◆  बीड शहरातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप तात्काळ डाऊनलोड करून वापरणे बंधनकारक राहील.

◆  बीड शहरात फक्त फिरते दूध विक्रेते यांना परवानगी राहील. कोणत्याही दुकानदारा मार्फत दूध विक्री केली जाणार नाही किंवा दुकान उघडणार नाही. त्यांनी दुधाची पाकिटांची होम डिलिव्हरी करावी.

◆  जार वॉटर सप्लायर्स यांनी पाणी जारद्वारे वाटप न करता ग्राहकाकडील उपलब्ध भांड्यामध्ये पाणी द्यावे. आणि त्यावेळेस सामाजिक अंतराचे पालन करावे.

◆  परवानाधारक भाजी व फळ विक्रेते यांना पूर्वीप्रमाणे परवानगी राहील. परंतु त्यांनी घरोघरी जाऊन विक्री करावी.

◆ घरगुती गॅस घरपोच सेवा देताना गॅस कंपनीचा गणवेश परिधान करावा व त्यांच्या गणवेश नसलेले कर्मचारी यांना नियमानुसार पास काढून सेवा द्यावी.

◆  वैद्यकीय कर्मचारी व औषध विक्रेते यांनी दवाखान्याचे ओळखपत्र अथवा ऑनलाईन पासद्वारे बीड शहरांतर्गत प्रवासात परवानगी देण्यात येत आहे.

◆  जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबाबतचे आदेश स्वतंत्ररित्या काढण्यात येतील असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.