बीडमध्ये महिलेची निर्घृण हत्या ; पती ताब्यात

 

बीड दि.29 ( सिटीझन ) बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेची हत्या झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. कत्तीने वार करून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात व्यक्त केला जात आहे. 

बीड शहरातील जालना रोडवर शहर ठाण्याच्या हद्दीत उर्मिला रमेश मस्के ( वय 28 रा. गॅरेज लाईन बीड ) या महिलेचा खून झाला असून घटनास्थळी कत्ती आढळून आली आहे. मयत महिलेचा पती रमेश वैजनाथ मस्के ( वय 35 रा.सुभाष रोड मंत्री गल्ली कॉर्नर ह.मु. गॅरेज लाईन बीड ) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून कारण मात्र समजू शकले नाही. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, शहर पोलिस ठाण्याचे पोनि.गजानन जाधव यांनी भेट दिली आहे. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.