बीड जिल्ह्यातील दुकाने दररोज सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत खुली राहणार

बीड दि.25 ( सिटीझन ) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी उद्या दिनांक 26 मे पासून मोठे बदल केले आहेत. यासंदर्भात आज काढलेल्या या आदेशांमध्ये सर्व आस्थापना दुकाने दररोज सकाळी 7.30  ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र सोशल डिस्टन्सचे नियम न पाळल्यास कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. सर्व केशकर्तनालय , ब्युटी पार्लर व तत्सम दुकानांना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांनाही नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे.

बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेशात म्हटले आहे की , सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत सर्व दुकाने चालू राहतील परवानगी दिलेल्या वेळेत परवानगी दिलेली कामे करण्यासाठी पासची आवश्यकता असणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

■ शाळा, कॉलेज, शैक्षणिक, प्रशिक्षण शिकवणी केंद्र बंद राहील .ऑनलाइन शिक्षण सुरु राहील.

■ सामन्य नागरिकांसाठी सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे बंद राहतील. 

■ सरकारी कर्मचारी त्याचबरोबर अलगीकरण आणिक विलगीकरण कक्ष यांच्यासाठी असलेली  उपाहारगृहे वगळता सर्व हॉटेल्स रेस्टॉरंट व इतर सेवा देणाऱ्या अस्थापना बंद राहतील. पार्सल सुविधा सुरू राहील.

■ सर्व सिनेमागृह,  मॉल , व्यायाम शाळा,  जलतरण तलाव,  मनोरंजन  उद्याने , प्रेक्षागृह सभागृह बंद . सर्व सामाजिक-राजकीय कार्यक्रमास बंदी राहील.

■ दुचाकी - एक चालक, तीनचाकी - चालक+दोन प्रवासी , चार चाकी -चालक + दोन प्रवासी याप्रमाणे परवानगी देण्यात आली आहे. 

■ जिल्हांतर्गत बससेवेला केवळ 50 टक्के प्रवासी क्षमतेसह परवानगी देण्यात आली आहे.

■ बार व दारू दुकानांना परवानगी देण्यासाठी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार. 

■ पान टपरी,  तंबाखू , गुटखा , पान मसाला या सर्व बाबींच्या विक्री आणि सार्वजनिक सेवनास बंदी कायम राहील.

■ सर्व केशकर्तनालय (कटिंगची दुकाने ) ब्युटी पार्लर व तत्सम दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

■संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या काळामध्ये जीवनावश्यक सेवांशी संबंधित व्यक्ती व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती पास असूनही घराबाहेर राहू शकणार. 

■ बँकांनी शासनाने ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे काम करावे. 

■ कोणत्याही दुकांनामध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्ती असून नये.

■ सदरील आदेश 31 मे 2020 रोजी रात्री 12 पर्यंत लागू राहतील. 

याप्रमाणे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज आदेश काढले आहेत. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.