बीड शहरातही कोरोनाचे रुग्ण आढळले

बीड जिल्ह्यातील 8 पॉझिटिव्ह कुठले आहेत वाचा 

बीड दि.20 ( सिटीझन ) गेली पन्नास दिवस कोरोना शून्य असलेल्या बीड जिल्ह्याची चिंता मात्र आता दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातून सोमवारी  66 जणांचे स्वब पाठविण्यात आले होते. त्यापैकी मंगळवारी रात्री उशिरा तब्बल 8 पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण खालील प्रमाणे आहेत.

1)  इटकूर ( ता.गेवराई )येथील एक  - वय 35
2) चंदनसावरगाव ता केज - वय 23 मुंबईहून आला 
3) केेेळगाव ता केज - वय 29 मुंबईहून आला 
4) ठाणे येथून आलेले दोघे - वय 22 व 44 (मोमीनपुरा, बीड)
5) ठाणे येथून आलेले - वय 16, 14 व 36 (रा सावतामाळी चौक, बीड)

बीड जिल्ह्यातील 66 जणांचे स्वब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. आजपर्यंत रिपोर्ट रात्री 9 वाजेपर्यंत येत होते मात्र आज रिपोर्ट येण्यास 11.30 वाजेपर्यंत वाट पाहावी लागली. त्यामुळे सर्वांनाच धाकधूक होती. आजच्या रिपोर्टमध्ये नेमके काय येते ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर 66 जणांचे रिपोर्ट आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून त्यापैकी 8  पॉझिटिव्ह आढळले आहेत तर 55 निगेटिव्ह आले असून 3 रिपोर्ट प्रलंबित आहेत.  नागरीकांनी काळजी घेण्याची गरज असून घाबरून न जाता सतर्क राहणे आवश्यक आहे. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.