बीड शहरला डॅशिंग अधिकारी मिळाला ; आता गजानन जाधव ठाणेदार

बीड दि.18 ( सिटीझन ) येथील शहर पोलीस ठाण्याचे पीआय वासुदेव मोरे यांची बदली झाल्यानंतर आता ठाण्याचा पदभार एपीआय गजानन जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेत मिसळणारे आणि कारवाईही तेवढीच डॅशिंग भूमिका बजावणारे अधिकारी म्हणून गजानन जाधव यांची ओळख आहे. शहर पोलीस ठाण्यासारख्या मोठ्या आणि जबाबदार ठाण्यासाठी जाधव यांच्यासारखाच अधिकारी हवा होता, अशी प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.एपीआय गजानन जाधव यांनी दरोडा प्रतिबंधक विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. विविध स्वरूपाच्या गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.