बीड जिल्ह्यातील चेकपोस्टवर स्टिंग ऑपरेशन तीन पोलीस निलंबित ; तिघांना दंड तर पाच जणांना बक्षीसी !

बीड दि.16 ( सिटीझन ) कोरोना चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात बीड पोलीसांकडून जिल्ह्याच्या सिमेवर 23 ठिकाणी चेकपोस्ट तैनात करण्यात आलेल्या आहेत.त्या चेकपोस्टवर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आरोग्य कर्मचारी तसेच शिक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. बाहेरील जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात येणारे प्रवासी नागरिकांचे पास व कागदपत्रे यांची पाहणी करून त्यांना जिल्ह्यात
प्रवेश देण्यात येत आहे परंतू काही चेकपोस्टवरील अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य करतांना काळजीपूर्वक नागरिकांची विचारपूस व कागदपत्राची पाहणी न करता आपल्या अधिकारात बीड जिल्ह्यात प्रवेश देत असल्याचे माहीती मिळाली. प्रत्येक चेकपोस्टवरील अधिकारी व कर्मचारी हे नागरिकांची कागदपत्र आणि पास ची
पाहणी,पडताळणी करून जिल्ह्यात प्रवेश देतात का ? याबाबत शहानिशा करण्यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक  विजय कबाडे यांनी जिल्ह्यात दि.15 मे 2020 रोजी दिवसा रात्री चेकपोस्टवर खाजगी डमी प्रवासी वाहनासह बाहेर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पाठवून खात्री केली. त्यामध्ये कुठे काय घडले वाचा खालील घटनाक्रम 

दि.15 मे रोजी रात्री 11 वा. शहागड-खामगांव चेकपोस्ट गेवराई पोलीस ठाणे अंतर्गत ठिकाणी डमी प्रवासी यांनी चेकपोस्टवर जिल्ह्यात येण्यासाठी विनंती केल्यावर तेथील कर्मचारी पोना/559 एस.बी.उगले यांनी डमी प्रवासी यांच्याकडे पैश्याची मागणी केली त्यामुळे पोलीस कर्मचारी यांनी बिनापास प्रवासी प्रवेश करण्यास मदत करतांना आढळून आले म्हणून चेकपोस्टवर पोह: 915 एम के बहीरवाळ ,  पोना/1458 डी.बी.गुरसाळे आणि  पोना/559 एस.बी.उगले
यांना त्वरीत प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे.

महारटाकळी ( ता. गेवराई ) येथील चेकपोस्ट चकलंबा पोलीस टाणे अंतर्गत ठिकाणो डमी प्रवासी यांनी चेकपोस्ट ओलांडुन शेवगाव कडे जात असतांना चेकपोस्ट वरील कर्मचारी यांनी इसमास थांबविले नाही परत 15 मिनिटांनी बीड जिल्ह्यात येतांना कसल्याही प्रकारची चौकशी केली नाही म्हणून  पोना/246 बी.बी.लोहबंदे ,  पोना/1529 एस.के लखेवाड आणि  पोना/931 एस.एस.वाघमारे यांना सदर कसूरी बाबत 3000/- रू. दंडाची शिक्षा देण्यात आली
आहे. 

मातोरी येथील चेकपोस्ट चकलंबा पोलीस ठाणे अंतर्गत ठिकाणी डमी प्रवासी यांनी अहमदनगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करते वेळी मातोरी चेकपोस्टवरील कर्मचारी यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता त्या इसमास जिल्ह्यात प्रवेश दिला नाही. या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोह 173 डी.एम.राऊत,  पोना/04 डी.एम.डोंगरे आणि पोशि 2291 टी.यू.पवळ यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी 5000/- रू व जीएसटी बक्षीस मंजूर करण्यात आले आहे.

दौलावडगांव ( ता.आष्टी ) येथील चेकपोस्ट अंभोरा पोलीस ठाणे अंतर्गत ठिकाणी डमी प्रवासी यांनी अहमदनगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करते वेळी दौलावड्गाव चेकपोस्टवरील कर्मचारी यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता त्या इसमास
जिल्ह्यात प्रवेश दिला नाही या उत्कृष्ट कामगिरी बदल पोह780 एस.ए.येवले, पोह1230 व्ही.एस.माळी यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी 5000/- रू व जीएसटी बक्षीस मंजूर करण्यात आले आहे. सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक हर्ष पो्दार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक  विजय कबाडे आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी टिमने केले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.